04/02/26
Breaking News

महाराष्ट्र

तलाठी व मंडळाधिकारी संपावर कामकाज ठप्प..

पुर्णा (सुशीलकुमार दळवी) तालुक्यातील महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील महत्त्वाचे असलेले ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंडळ अधिकारी आज पासून सोमवार दि.15. संपावर गेले आहेत. नागरिकांना तातडीने ऑनलाइन सुविधा मिळण्यासाठी लॅपटॉप आणि इतर संबंधित साधनसामग्री तातडीने पुरवठा करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र. (डीएसएससी) प्रशासनाकडे जमा करून संप पुकारला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व कामकाज …

Read More »

वाचा कोणत्या मनपाची कधी संपली मुदत…काहींची तर पाच वर्षे झाली

मुंबई, दि. 15: बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. येथील सह्याद्री अतिथिगृहात महानगरपालिका …

Read More »

29 महापालिका निवडणुकांची घोषणा,15 जानेवारीला मतदान

राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. खालील तक्त्यात पाहा निवडणुकीचा कार्यक्रम उमेदवारी दाखल 23 ते 30 डिसेंबर उमेदवार अर्जांची छाननी 31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी …

Read More »

सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ,सोमवारच्या सोन्याचा दराकडे ग्राहकांच्या नजरा

देशात पुन्हा एकदा सोनं अन् चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवडाभरात सोन्याला आणि चांदीला झळाळी मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे, त्यातच सोने, चांदीच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली आहे. मागील आठवडाभरात चांदीचे दर प्रति किलो ८ हजार रूपयांनी वाढले आहेत. तर सोन्याच्या दरातही ३७७० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, जळगाव अन् दिल्लीसह देशात सोन्याच्या …

Read More »

लाडक्या बहि‍णींना पुन्हा एक संधी….ईकेवायसी करताना झालेली चुक दुरुस्त होणार

राज्यातील अपात्र अन् बोगस लाडक्या बहि‍णींना वगळण्यासाठी राज्य सरकारकडून ई केवायसी करण्यात येत आहे. त्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही डेडलाईन ठरवण्यात आली आहे. पण अनेक लाडक्या बहिणींकडून ईकेवायसी करताना चुका झाल्याचे समोर आले. त्यामुळे राज्य सरकारकडून लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ई केवायसी करताना चूक झाली असेल तर ती दुरूस्त करण्याची संधी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर …

Read More »

शक्तिपीठ मार्ग बदलणार, आता कोणत्या जिल्ह्यातून आणि कसा जाणार?

शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शक्तिपीठ महामार्गात काहीसा बदल करण्यात आला आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली. सोलापूर आणि सांगलीतून पुढे असा हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गात नेमका काय बदल करण्यात आला आणि हा बदल का करण्यात येत आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांची दिली. हा शक्तिपीठ महामार्ग फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. या …

Read More »

संत जनाबाई मंदिर विकास आराखड्याची मंजुरी अंतिम टप्प्यात

आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या लक्षवेधीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लेखी उत्तर गंगाखेड / प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा – नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी विधानसभा नियम १०५ अन्वये नगर विकास विभागाकडे लक्षवेधी सूचना क्रमांक ५७२ मांडली होती. त्यात गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सादर केलेल्या आराखड्याच्या मंजुरीबाबत विचारणा करण्यात आली होती. …

Read More »

जीवघेणा ठरत असलेल्या मांजाची सेलूत कसून तपासणी सुरू

पोलीस प्रशासनाची शहरात झडती मोहीम सेलू / प्रतिनिधी – सध्या सर्वत्र पतंग उडविण्याचा हंगाम जोरात चालू असतानाच नायलॉन मांजाचा वाढता धोका लक्षात घेता .शहरात पोलीस प्रशासनाकडून मांजा विक्रेत्यांवर कार्यवाहीचा फास आवळणे सुरू केले असून शहरात नायलॉन गांजाच्या अनुषंगाने दुकानांची झडती मोहीम सुरू केले आहे . पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय बलभीम राऊत ,हेड कॉन्स्टेबल तेलंग व …

Read More »

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 22 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

सेलू / प्रतिनिधी – माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या “हार-तुरे-शाल, पोस्टरबाजी किंवा अन्य अनावश्यक खर्च न करता जनहितासाठी योगदान द्या” या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानुसार जिंतूर सेलू मतदारसंघातील सर्व बोर्डीकर प्रेमी तसेच आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने जमा झालेली झालेले रक्कम *22 लाख रूपयाचा धनादेश आज नागपूर येथे मा .राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या …

Read More »

घरकुलाच्या थकीत हप्ते प्रकरणी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील बऱ्याच घरकुल धारकांचे थकित हप्ते तात्काळ जमा करावे नसता ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा व्यंकटेश्वर प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आला आहे . तालुक्यातील पीएम आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, अहिल्यादेवी होळकर आवास योजना या योजनांचे हप्ते मागील अनेक महिन्यापासून जमा झालेले नाहीत या आवास योजनांचे लाभ घेणारे लोक हे वंचित व गरीब परिस्थितीचे …

Read More »