08/11/26
Breaking News

महाराष्ट्र

पेपरफुटी प्रकरणी तक्रारदार तरुण अखेर आला समोर, सगळं सांगितलं

नीट पेपर लिक प्रकरणी देशभरात जन आंदोलनाचा भडका उडाला आणि अखेरीस केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. ही घटना ताजी असताना महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाची समजली जाणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपर लिक झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यानंतर आता तक्रारदार सुद्धा समोर आला आहे.  तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे याने संशयितांच्या मोबाईल फॉरेन्सिक आणि CBI …

Read More »

श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कारासाठी डॉ. पवन चांडक यांची निवड

परभणी,दि 27  प्रतिनिधी सन २०२६ चा ‘श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार’ परभणी येथील डॉ. पवन चांडक यांना जाहीर झाला आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे, मोबाईल व्यसनमुक्तीचा संदेश देणे आणि पुस्तकांशी विद्यार्थ्यांची मैत्री घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या दिवंगत श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ येथील ‘संडे क्लब’ आणि …

Read More »

परभणी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची माहिती…

परभणी / प्रतिनिधी – परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य रायझिंग मेन पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले असून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे जल अभियंता तन्वीर बेग यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, गौतमनगर परिसरात मुख्य रायझिंग मेन पाइपलाइन फुटल्याने गेल्या आठवड्यापासून परभणी शहराचा पाणीपुरवठा बंद होता. या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे …

Read More »

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

सेलू न्यायालयाचा धनादेशाच्या दुप्पट रकमेची नुकसान भरपाई देण्याचा आदेश सेलू / प्रतिनिधी : धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणातील दोन स्वतंत्र खटल्यांमध्ये न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सेलू येथील मा. न्यायाधीश गौरव अ. तराळ यांनी आरोपीस दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, संबंधित धनादेशांच्या दुप्पट रकमेची नुकसानभरपाई फिर्यादीस एका महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश दिले आहेत. हा निकाल दि. २२ जुलै २०२६ …

Read More »

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची मोठी घोषणा; उद्याचा मोर्चा होणार की नाही?

मुंबई – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, या आंदोलनात सहभागी झालेल्या अभिजीत दिपके आणि देशभरातील सर्व तरुणांचे मनापासून अभिनंदन. आंदोलनाला निर्भयपणे पाठिंबा देणाऱ्या पालकांचेही …

Read More »

देशाच्या राजधानीत पत्रकारांचा राष्ट्रीय मेळावा, दिल्लीत २७ व २८ जुलै रोजी व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अधिवेशन

नवी दिल्ली | प्रतिनिधी देशातील पत्रकारांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडवून आणण्यासाठी आणि पत्रकारितेच्या भविष्यासंदर्भात दिशा ठरविण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया (व्ही ओ एम ) व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने २७ व २८ जुलै रोजी नवी दिल्ली येथील विश्व युवा केंद्र येथे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणाऱ्या या अधिवेशनात …

Read More »

दादरमध्ये महिला आंदोलकाशी पोलिसाचं धक्कादायक कृत्य? व्हिडिओ व्हायरल; ‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’

‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’ ‘Don’t just suspend him—throw him straight into jail!’ मुंबई – मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ चर्चेत असतानाच आता दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका साध्या वेशातील पोलीस अधिकाऱ्याने महिला आंदोलकाशी अयोग्य वर्तन …

Read More »

सावधान भगर खाताय… मग हे वाचाच…!

शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक उपवास करतात. उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. तुम्ही पण उपवासाला भगरीचे वेगवेगळे पदार्थ करुन खाण्याचे ठरवत असाल तर थोडं थांबा… आधी हे वाचा…. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. त्यामूळे भगर खाताना थोडी काळजी घ्या. खर तर भगर हा …

Read More »

विभागीय आयुक्तांनी पिक विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले,आमदार राजेश विटेकर यांनी दिली माहीती

परभणी (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील 17 महसूल मंडळातील पिक विमा प्रकरणी कंपनीने दाखल केलेले आक्षेप (दिस्पुट) विभागीय आयुक्तांनी फेटाळले असून जिल्हाधिकारी परभणी यांनी पाठवलेला अहवाल मान्य केला आहे, त्यामुळे प्रलंबित राहिलेल्या वरील 17 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तसेच कंपनी पिकविम्या बाबत दरवर्षी जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याने याप्रकरणी आज विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर श्री जी श्रीकांत …

Read More »

 शेतकरी कर्जमुक्ती योजनेत लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण आता बायोमेट्रिक पद्धतीनेच

परभणी, दि. २२ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक, आधार नोंदणीची प्रक्रिया अधिक प्रभावी व सुरक्षित करण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात सहकारचे अपर आयुक्त व विशेष निबंधक (सहकारी संस्था) नागनाथ यगलेवाड यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. शासन निर्णयानुसार, योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच …

Read More »