04/02/26
Breaking News

महाराष्ट्र

मराठा आरक्षण आंदोलनात खासदार,आमदारांचा सहभाग,सरकारवर दबाव वाढला..

मुंबई,दि 29 ः मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या  मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार, खासदार यांनी पाठिंबा दिला आहे.या प्रमुख नेत्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे.उद्या शनिवारी काही आमदार खासदार सहभागी होणार असल्याची माहीती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह आंदोलक शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईत दाखल झाले. मनोज …

Read More »

मराठा आंदोलकांसाठी गुड न्युज..आता शनिवारीही

मुंबई,दि 29 ः मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी उद्या उपोषण करण्याची परवानगी दिली आहे आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रानंतर ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई पोलिस सत्य नारायण चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. ती मुदत आता संपली …

Read More »

पूर्णेत नगरपालीकेने तयार केलेल्या खड्यात बुडून बालकाचा मृत्यु

सुशीलकुमार दळवी पुर्णा,दि 29 ः पुर्णा नगर परिषदेकडून शहराच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी नव्याने तयार करण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यात पडुन विश्वदीप संदीप कांबळे या दहा वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना पुर्णा शहरातील हरीनगर भागात घडली काल २८ ऑगस्ट रोजी विश्वदीप पावसात बाहेर गेला होता त्यावेळी रात्रीच्या या परिसरात खड्डा पाण्याने भरला असताना त्याचा लक्षात न आल्या मुळे …

Read More »

जिकडे नजर जाईल तिकडे फक्त मराठे…मुंबईत भगवं वादळ

मराठा सामाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून आमरण उपोषण करत आहेत. तब्बल हजारो किलमोटीरचा प्रवास करून मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते, मराठा बांधव देखील हजर होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईचा नारा दिला. यावेळी मनोज जरांगे …

Read More »

मुसळधार पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल

हैदराबाद विभागातील भिकनूर – तळमडला – अक्कनपेट सेक्शन मध्ये काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी खालीलप्रमाणे बदल लक्षात घ्यावेत: 1️⃣ (दिनांक 28 ऑगस्ट 2025) रोजी सुटणारी गाडी क्र. 17064 काचेगुडा – मनमाड अजंठा एक्स्प्रेस ही गाडी सिकंदराबाद – विकाराबाद – परळी – परभणी मार्गे वळविण्यात आली आहे. या गाडीला माल्काज्गिरी, बोलाराम, मेद्चल, कामारेड्डी, …

Read More »

शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश निघाला,एक जिल्हा वगळला

सांगली, कोल्हापूरच्या काही तालुक्यांतील शेतकऱ्यांचा विरोध डावलून सरकारचे शक्तिपीठ महामार्गाच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश राज्य शासनाने पारित केला आहे. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच महापालिका निवडणुकांच्या आधी फटका बसू नये याकरिता कोल्हापूरला वगळण्याची सावधगिरी शासनाने बाळगली आहे. कोल्हापूरकरांचा विरोध पाहता केवळ वर्धा ते सांगली …

Read More »

पुन्हा पाऊस..अलर्ट रहा..किती पडेल हे सांगता येणार नाही

गणेशोत्सवादरम्यान काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळणार आहे. तर बीड, लातूर, नांदेड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याकडून हा अलर्ट जारी करताना राज्यातील काही जिल्ह्यात पावसाच्या सरींसह वारे प्रतितास ४० ते ६० किमी …

Read More »

इतिहासातील सर्वात मोठ भगवं वादळ….अनेक किलोमीटरपर्यंत रांगा

परभणी,दि 27 ः मनोज जरांगे पाटील मुंबईला येण्यासाठी आंतरवाली सराटीतून सकाळी १० वाजता निघाले आहेत. त्यांच्यामागे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांचा ताफा आहे. तसेच कार्यकर्त्यांकडून चौका-चौकात त्यांच्यावर फुलांची वृष्टी होत आहे. मनोज जरांगे यांचा ताफा आता पैठणमधून बाहेर पडला आहे. मनोज जरांगे पाटील पुण्यात आल्यानंतर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करणार आहेत. पुणे येथील वाहतूक व्यवस्था या मोर्चाच्या दृष्टीने चोख ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन …

Read More »

आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी,वाचा अटी

परभणी,दि 27 मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना काल दिनांक 26 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत आंदोलनासाठी परवानगी नाकारली होती. परंतु, तरीदेखील मनोज जरांगे यांनी आज सकाळपासूनच मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी एका दिवसासाठी देण्यात …

Read More »

युनियन बँकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

परभणी,दि 26 ः परभणी शहरातील युनियन बँक शाखेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवार (दि.26) आंदोलन केल्याने कर्जप्रकरणे मंजुर झाली आहेत. या बँकेला अनेक गाव दत्तक आहे. त्यातील वझुर ता.पूर्णा येथील गावातील शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावत नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत गेल्या जुन महिन्या पासुन शेतकरी संपुर्ण कागदपत्रे देऊन सुद्धा बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायला तयार …

Read More »