09/05/26
Breaking News

मराठवाडा

सेवानिवृत्त शिक्षकाची ९७ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक

सेलू ( नारायण पाटील ) येथील मौलाना आझाद नगर मधील सेवानिवृत्त शिक्षक नागनाथ शंकरराव कुरमुडले यांना आरोपितांनी वेगवेगळ्या दूरध्वनी क्रमांकावरून ८ एप्रिल रोजी आरोपीच्या दूरध्वनीवर फोन व व्हाटसपवरून व्ही डी ओ द्वारे अटक करण्याची धमकी देत ९७ लाख ८३ हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे . कुरमुडले यांच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात गु र न १८१/२०२६ नुसार सेलू पोलिसात गुन्हा नोंद …

Read More »

संत साईबाबांचे गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या जीवनावरील ग्रंथाचे प्रकाशन

सेलू दि ११(प्रतिनिधी) शिर्डीच्या साईबाबांचे गुरू तथा शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या चरित्राचे गद्य रूपांतर पुस्तक प्रकाशन सोहळा आज दि ११ एप्रिल रोजी सायं 6 वा. श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरातील सभागृहात थाटात संपन्न झाला.केशवराज बाबासाहेब महाराज यांचे वंशज अनुराधा प्रभाकर सुभेदार यांनी बाबासाहेब महाराजांच्या ओवीबद्ध असलेल्या ग्रंथाचे गद्य रुपात रूपांतर केलेल्या ग्रंथ प्रकाशन यावेळी करण्यात आले. या …

Read More »

राणीसावरगाव येथील केदारेश्वर महादेव मंदिराचा दुर्मिळ दानशिलालेख

गंगाखेड प्रतिनिधी : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या मौजे राणीसावरगाव येथे केदारेश्वर महादेव मंदिरासंबंधीचा एक अत्यंत महत्त्वाचा व दुर्मिळ दानशिलालेख आजही सुस्थितीत आढळून येतो. हा शिलालेख मुख्य गावापासून सुमारे एक मैल अंतरावर, गावाच्या दक्षिण दिशेला केदार तांडा–घाटवाडी रस्त्यालगत श्री नारायण बापुराव जाधव यांच्या शेतातील बांधावर चौकोनी आकाराच्या दगडी शिळेवर कोरलेला आहे. हा शिलालेख दोन भागांत …

Read More »

सेलूत पाथरी कॉर्नर परिसरात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्याची मागणी

सेलू ( प्रतिनिधी ) थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा पाथरी कॉर्नर परिसरात बसवावा अशी मागणी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे सेलू तालुक्यातील फुले प्रेमी कडून होत आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सेलू शहरातील फुलेनगर येथे नगरपालिका सेलू यांच्या वतीने जयंतीदिनी पुरेसा मंडप, विद्युत रोषणाई, ध्वनीक्षेपक, फुलांची सजावट, शुभेच्छा फलक कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. महाराष्ट्र शासन …

Read More »

गणेश माळवे यांची पर्यवेक्षकपदी नियुक्ती

सेलु,दि 11 ः येथील नूतन विद्यालयात पदोन्नतीने उपक्रमशील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक गणेश शेषराव माळवे यांची गुरुवार ( दि. १० ) रोजी पर्यवेक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन विद्यालयात क्रीडा शिक्षक पदावर ३० वर्षे प्रदिर्घ सेवेत अनेक राष्ट्रीय व राज्य खेळाडूंना मार्गदर्शन करत‌, सेलू तालुक्यात अनेक राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. विविध क्रीडा सुविधा निर्माण केल्या आहेत.खेलो इंडिया बीच …

Read More »

पूर्णेत जलकुंभ बांधकामाला अनाधिकृत विजपुरवठा,प्रशासनाचे अभय

पुर्णा,दि 10 (प्रतिनिधी) पूर्णा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या शहरात चार ठिकाणी टाक्यांचे बांधकाम सुरू आहे संबंधित गुत्तेदाराने अनधिकृत विद्युत पुरवठा घेत वीजचोरी केली सदरील गुत्तेदारास चार महिन्यापूर्वी दंड ठोठावण्यात आला परंतु अधिकृत मीटर न घेता पुन्हा वीजचोरी करताना दिसून आल्याने संबंधित गुत्तेदारास पुन्हा दंड आकारण्यात आला परंतु संबंधित गुत्तेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने सदरील गुत्तेदारावर राजकीय वरदहस्त असल्याने अधिकारी मूग …

Read More »

जिंतूरात आयुष्यमान सेवा सप्ताहात पंधराशे कार्ड वाटप,डॉ. समीर जानिमियाँ पुढाकाराने उपक्रम यशस्वी

जिंतूर / प्रतिनिधी जिंतूर : शहरातील सामाजिक उपक्रमांना नवी दिशा देण्याकरीता पालकमंत्री ना मेघना बोर्डीकर यांच्या अभिष्टचिंतन दिनाचे औचित्य साधून शहरात आयुष्यमान सेवा सप्ताहाच्या निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ.समीर जनिमिया यांच्या पुढाकाराने आरोग्यविषयक जनजागृतीसह आयुष्यमान कार्ड वाटपाची विशेष मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत तब्बल पंधराशे लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेची कार्डे वितरित करण्यात आली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अभिष्टचिंतन …

Read More »

जिल्हा परिषदेत आठव्या पोषण पंधरवडा अभियानाचा शुभारंभ

परभणी,दि 09 ः बालकांच्या पहिल्या सहा वर्षातील बुद्धीचा विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोषण पंधरवडा अभियानाचा शुभारंभ परभणी जिल्हा परिषद येथे उत्साहात करण्यात आला. गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद परभणी येथील सभागृहामध्ये महिला व बालविकास सभापती ऐश्वर्या अजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी …

Read More »

जिल्ह्यातील सर्व शाळांची होणार पटपडताळणी

परभणी,दि 08 ः जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवी आणि इयत्ता नववी ते अकरावी च्या विद्यार्थ्यांची पट पडताळणी दिनांक 11 ते 22 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक सविता बिरगे यांनी दिली आहे. सदरची पट पडताळणी करण्या बाबतच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी परीक्षेच्या …

Read More »

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदवा; युवकांना आवाहन

परभणी, दि. 08  : भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉरपोरेट अफेअर्स अंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरु करण्यात आली असून जिल्ह्यातील युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत खंदारे यांनी केले आहे. या योजनेसाठी 18 ते 25 वयोगटातील पुर्णवेळ शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण किंवा नोकरीत नसलेला भारतीय युवा वर्ग पात्र आहे. या योजनेअंतर्गत देशातील …

Read More »