27/07/26
Breaking News

ओला दुष्काळ जाहीर करा,संभाजी ब्रिगेडची मागणी

परभणी,दि 29 (प्रतिनिधी)ः
अतिवृष्टी ग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 50 हजार ते एक लाख देण्याची मागणीसंभाजी ब्रिगेडने सोमवार दिनांक 29 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे सरकारने आपली तिजोरी खुली करावी तसेच आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करावी आणि ती रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सैनिक बालाजी शिंदे, महानगर अध्यक्ष गजानन जोगदंड, माजी जिल्हाध्यक्ष दिनकर गरुड, साहेबराव शिंदे, अभिजीत देशमुख, अविनाश पोळ, स्वप्निल गरुड, पांडुरंग शिंदे, संदीप गव्हाणे, गंगाधर कदम, भरत बोबडे, स्वप्निल कदम, प्रसाद खटिंग, गजानन खटिंग, रमेश खटिंग,तुळशीराम खटिंग, राजाराम पोते, शेषराव कटिंग, बळीराम राऊत आदी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी निवेदन स्वीकारले.

Check Also

सावधान भगर खाताय… मग हे वाचाच…!

शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक उपवास …