परभणी (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक शेतमजूर आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय स्वरचित ‘लोकगायिका’ कांताबाई शिंदे यांनी आई महोत्सवात गुरुवारी काव्यगायन करत सादर केलेल्या आपल्या हदयस्पर्शी गीतांनी उपस्थितांची उस्फुर्त दाद मिळवली. मानव सेवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्त्रीशक्ती, मातृत्व आणि कर्तृत्ववान मातांच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी परभणी शहरातील समाधान नगरात श्री राजीव गांधी विद्यालयाच्या प्रांगणात दि. २१ ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित तीन दिवसीय …
Read More »Shabdraj
प्रजासत्ताक दिनानिमित्त सेलूत घुमणार देशभक्तीपर गीतांचा आवाज
सेलू ( प्रतिनिधी ) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस प्रशासन परभणी व स्वरयात्री म्युझिकल ग्रुप सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने सेलू शहरात देशभक्तीपर गीतांच्या भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता साई नाट्यगृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसंग्राम, भारतीय संविधान, राष्ट्रप्रेम व बलिदान यांचे दर्शन घडविणारी देशभक्तीपर गीते सादर …
Read More »सुर्यनमस्काराने नवचैतन्य निर्माण होते -गटविकास अधिकारी उदय जाधव
सेलू दि २४ (प्रतिनिधी) शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केले तर जीवनात नवचैतन्य निर्माण होते. योगासन आणि सूर्यनमस्कार ही आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग असायला हवे.यामुळे मन,शरीर स्थिर राहून कठीण प्रसंगात आपली निर्णयक्षमता वाढते असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी केले. येथील नूतन विद्यालयात आज दि २४ जानेवारी रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …
Read More »सेलू नगर पालिकेच्या कत्तलखान्यावर पोलीसांचा छापा,तीन गोवंशाची कत्तल उघड
@ एका अल्पवयीन आरोपीसह ६ जणांवर गुन्हा दाखल @४लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. सेलू ( प्रतिनिधी ) शहरातील एकबाल नगर मध्ये असलेल्या नगरपालिकेच्या कत्तलखान्यात ३गोवंश प्राण्याचे मास आणि कत्तलीसाठी आणलेली तेरा जनावरे आढळून आले असून यांची वाहनासह ४ लाख १४ हजार रुपयाची मालमत्ता पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. ही घटना गुरुवार २२ जानेवारी रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली असून गुन्हा …
Read More »बंद पडलेली पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी
सेलू( प्रतिनिधी ) येथे विद्यानगर परिसरात शालेय विद्यार्थिनींना रोडरोमिओचा त्रास होत असल्यामुळे पालक व नागरिकांच्या मागणी नुसार तिथे नगर परिषदेच्या शॉपिंग सेंटर भागात एक पोलीस चौकी उभारण्यात आली होती .व त्यावचौकीचे उदघाटन देखील संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात झाले होते .परंतु गेल्या कित्येक दिवसापासून सदरील पोलीस चौकी बंद झाल्यामुळे पुन्हा रोडरोमिओचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे .त्यासाठी आज सदरील पोलिस …
Read More »पोलिसांच्या संवेदनशील प्रयत्नामुळे १२ वर्षानंतर मायलेकांची झाली भेट
नारायण पाटील सेलू,दि 23 ः खबर मिळताच माणुसकी व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत सेलू पोलिसांनी केलेल्या संवेदनशील प्रयत्नामुळे तब्बल १२ वर्षानंतर येथील मायलेकांची भेट झाली आहे .पोलिसांनी दाखवलेल्या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे . मुंबई कार्यक्षेत्रात १३ जानेवारीला भिक्षेकरीविरुद्ध कारवाई दरम्यान पोलीस पथकाला एक महिला भिक्षा असताना आढळून आली. संबंधित पोलीस यंत्रणेने या महिलेला जे जे मार्ग पोलीस ठाणे येथे …
Read More »“कोंडी” कथासंग्रह म्हणजे संघर्षशील व्यक्तीचा प्रवास – प्रा.डॉ. कीर्तीकुमार मोरे
सेलू ( प्रतिनिधी ) शेतमालाचे भाव कोसळल्यावर शेतकऱ्यांच्या मनं सुन्न करणारी अवस्था ,भूक,स्त्री , शोषण आणि कठीण परिस्थिशी दोन हात करणाऱ्या संघर्षशील व्यक्तीचा ठाव घेणारा कोंडी या कथासंग्रहातून होते. असं प्रतिपादन प्रा. डॉ. कीर्तीकुमार मोरे यांनी सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या एक दिवस एक पुस्तक व मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने ३६ वे पुष्प गुंफताना केले. येथील …
Read More »सायन्स एक्स्पो मध्ये नूतन महाविद्यालयाचे यश
सेलू,दि.22 दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकरच्या वतीने आयोजित DBC Science Expo 2026 मध्ये नूतन महाविद्यालय, सेलू येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रतिकृती (मॉडेल्स), सेमिनार सादरीकरणे तसेच संशोधन पोस्टर्स प्रभावीपणे सादर केली. यामध्ये समर्थ सचिन कुंडीकर यास सेमिनार सादरीकरण मध्ये तृतीय क्रमांक तर यज्ञेश दिगंबरराव जोशी यास पोस्टर सादरीकरणमध्ये …
Read More »नंदू दरक यांना स्वीकृत सदस्य पदी घेण्याची जनतेची मागणी
आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या निर्णयाकडे जनतेचे लक्ष परभणी प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक 15 मधून सर्वसाधारण पुरुष गटातून निवडून लढवलेले उमेदवार नंदकिशोर दरक हे अत्यल्प मताने पराभूत झाले. परंतु जनतेसाठी सतत सेवेस तत्पर असलेल्या नंदकिशोर दरक यांना परभणी महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य पदी घेण्यात यावे अशी मागणी प्रभागातील नागरिकांतून करण्यात येत आहे. मागील निवडणुकीत नंदकिशोर दरक हे प्रभाग क्रमांक 15 मधून …
Read More »लाडकी बहीण योजने बाबत मोठी अपडेट..सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
ई-केवायसीमध्ये चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक महिला लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरल्या होत्या. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून दीड हजार रुपयांचा हप्ता न आल्यानं लाडक्या बहिणी संतप्त झाल्या होत्या. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी महिलांनी आंदोलनं केली. बुलढाण्यातील संतप्त लाडक्या बहिणींनी १९ जानेवारीला महिला बाल कल्याण कार्यलयातच ठिय्या मांडला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २० जानेवारीला रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक दिली. या आंदोलनांची दखल घेत …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com