06/11/26
Breaking News

Shabdraj

शिवाजी मुटकुळे यांनी साधला शहरातील व्यापारी बांधवांशी संवाद

हिंगोली (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विश्वास, विकास आणि जनकल्याण या यशस्वी १२ वर्षांच्या ऐतिहासिक कार्यकाळाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने जनसंपर्क अभियान राबविण्यात आले.या अभियानांतर्गत शिवाजी मुटकुळे यांनी शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये व्यापारी बांधव आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना, देशपातळीवरील ऐतिहासिक विकासकामे आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित माहिती पत्रकांचे वाटप …

Read More »

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या तसेच निवास, भोजन व इतर सुविधांच्या अभावामुळे शिक्षण सुरू ठेवण्यास अडचण येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ मधील प्रलंबित (Sent Back) अर्जांच्या त्रुटी पूर्ततेसाठी समाजकल्याण विभागाकडून अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता ११ वी, …

Read More »

आमदार रोहित पवार शुक्रवारी हिंगोलीत

हिंगोली,दि 24 ः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महासचिव शेतकऱ्यांचे तारणहार युवानेते आमदार रोहित पवार हे पंढरपूर शेतकरी कर्जमुक्ती अन्नत्याग आंदोलनानंतर पहिल्यांदा   शुक्रवारी (ता.26)  हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार असून सकाळी ९:३० वाजता राष्ट्रवादी भवन हिंगोली येथे शेतकरी-शेतमजूरांसोबत संवाद साधणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. …

Read More »

खासदारांना हिंगोलीत पाय ठेवू देणार नाही,उबाठा गटाचा इशारा

हिंगोली (विशेष प्रतिनिधी) : “नांदेडमध्ये कितीही गाजावाजा झाला असला, तरी संबंधित खासदारांनी आमच्या हक्काच्या मतांचा बाजार मांडला आहे. मतदारांशी प्रतारणा करून त्यांनी स्वतःचे मत विकले आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. जर त्यांच्यात हिंमत असती, तर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन पक्षांतर करायला हवे होते. पक्षाशी आणि मतदारांशी केलेल्या या गद्दारीमुळे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या काळजावर खोल घाव घातला गेला आहे,” असा संतप्त …

Read More »

लोहगडावर नेमक काय घडलं…मयत केतनच्या भावी पत्नीचे कारनामे समोर

लोहगड किल्ल्यावर २६ वर्षीय केतनला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याप्रकरणी एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर काटा आणणारा खुलासा झाला आहे. केतनची हत्या १८ जून रोजी झाली असली, तरी त्यापूर्वी १४ जून रोजी देखील त्याची भावी पत्नी सिया गोयल हिने त्याला लोहगडवरूनच दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने एका झुडपामुळे केतन बचावला, तेव्हा सियाने ‘साप-साप’ असे ओरडत नाटक करत, …

Read More »

बोरी ग्रामस्थांचे उपोषण स्थगित,प्रशासनाकडून अश्वासन …अप्पर तहसिल कार्यालयाचा लढा …

परभणी,दि 23ः बोरी ता.जिंतुर या ठिकाणी मंजूर झालेले अपर तहसील इतर ठिकाणी हलवल्याच्या निषेधार्थ बोरी ग्रामस्थांच्या वतीने गेल्या अकरा दिवसापासून येथील बाजार मैदानावर उपोषण सुरू करण्यात आले होते. हे उपोषण दिनांक 23 जून रोजी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या आश्वासनानंतर उपोषणाला स्थगिती दिल्याची माहिती उपोषण कर्त्यांनी यांनी दिली अप्पर तहसील कार्यालय बोरी येथे सुरु करण्याची सर्व प्रक्रिया झालेली असताना अचनाक …

Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीसाठी अँग्रीस्टँक नोंदणी अनिवार्य – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली, दि. 23 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील एकूण 908 थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, त्यासाठी 3 कोटी 67 लाख 77 हजार 214 इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील 181 शेतक-यांनी अँग्रीस्टँक नोंदणी अद्याप केलेली नाही, अशा शेतक-यांनी कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी अनिवार्य असलेली नोंदणी तात्काळ करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल …

Read More »

 जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष  गजाननराव घुगे यांचा उमेदवारी अर्ज

हिंगोली,दि 23 (प्रतिनिधी)ः परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार गजाननराव घुगे यांनी आपले उमेदवारी अर्ज परभणी येथे दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार गजाननराव घुगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, सहकाराची समृद्ध परंपरा जपत जिल्ह्यातील शेतकरी, बँक सभासद आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपण …

Read More »

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी डिग्रस येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रयत्न केले. आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या कामासाठी 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. डिग्रस फाटा दाटेगाव रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून या रस्त्यावरील पुलाचे काम सुद्धा सुरू आहे.विशेष म्हणजे डिग्रस फाटा ते दाटेगाव या …

Read More »

सेलूमध्ये महेश नवमीनिमित्त आरोग्य शिबिराला ३२१ नागरिकांचा प्रतिसाद

सेलू ( प्रतिनिधी ) माहेश्वरी समाजाचा पवित्र सण ‘महेश नवमी’चे औचित्य साधून सेलू तालुका माहेश्वरी युवा संघटना आणि माहेश्वरी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक श्री बालाजी मंदिर परिसरात रविवार, २१ जून २०२६ रोजी भव्य रक्त तपासणी, रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि जागरूकता या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त …

Read More »