सेलू (प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिनानिमित्त गणित जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. गणित जत्रा हा विद्यार्थींच्या गणिती संकल्पना स्पष्ट होण्यासाठी उपयुक्त उपक्रम असल्याचे जेष्ठ शिक्षक नारायण अष्टकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना स्वतःपैसे खर्च करताना आणि विविध वस्तुंची खरेदी- विक्री करताना गणित विषयातील बेरीज, वजाबाकी, भागाकार,गुणाकार, किलो ग्रॅम आणि मापनाच्या क्रिया करत असताना …
Read More »Shabdraj
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गंगाखेड तालुका अध्यक्षपदी ॲड. संतोष मुंडे
दै. शब्दराज / गंगाखेड – राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गंगाखेड तालुका अध्यक्षपदी ॲड. संतोष मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केली आहे. अलीकडे झालेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाची नैतिक जबाबदारी …
Read More »वालूर येथे अखंड हरिनाम सप्ताह, राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम
सेलू (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे वालूर (ता. सेलू) गावातील १५ वे वर्ष असून गुरुवारी (ता. १) या भव्य सप्ताहास उत्साहात प्रारंभ झाला असून ८ जानेवारी रोजी या सप्ताहाची सांगता होणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त १ जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद्भागवत कथा व विविध धार्मिक …
Read More »सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सेलू (प्रतिनिधी ) नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मिलिंद चंद्रकला ज्ञानदेव सावंत यांचा पदग्रहण समारंभ आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी, २ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्याला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची तसेच कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, सेलू बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोडगे …
Read More »सनातन रक्षा दलाच्या जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब राखे यांची नियुक्ती
गंगाखेड/परभणी (प्रतिनिधी) सनातन रक्षा दल केंद्रीय कार्यालय नवी दिल्ली संपूर्ण देशभर सनातन धर्माचे रक्षा करणे सनातन धर्माचे उपक्रम राबविणे ही संस्था कार्यरत आहे. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश मंत्री शंकरराव लोखंडे पंढरपूर यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष नीरज भाई मिश्रा यांनी परभणी जिल्हाध्यक्षपदी सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे व्यंकटेश उर्फ बाळासाहेब राखे यांची परभणी सनातन रक्षा दल जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती …
Read More »जि प प्राथमिक शाळा नामदेव नगर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
पाथरी प्रतिनिधी 3 जानेवारी शनिवार रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नामदेव नगर येथे बालिका दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक गोविंद हरकळ त्याचबरोबर नगरसेवक अमोल भाले उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत व सर्व समिती सदस्य उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक …
Read More »सावित्रीबाई यांच्याकडे समाजपरिवर्तनाची दृष्टी होती- राजेंद्र पवार
सेलू ( प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले ज्या सामाजिक वातावरणात जन्माला आल्या ते वातावरण अत्यंत प्रतिघामी विषम आणि अ मानवी होते. जातीभेद हा समाज व्यवस्थेचा कणा मानला जात होता. जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठतेचे नियम इतके कठोर होते की माणसाच्या आयुष्याची दिशा त्यांच्या जन्माने ठरवली जात होती. अस्पृश्यतेच्या नावाखाली समाजातील मोठ्या वर्गाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाकारला गेला होता. स्त्री ही पुरुषाची मालमत्ता …
Read More »विद्यार्थ्यांची जडण घडण व त्याचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी स्पर्धा आवश्यक- मिलिंद सावंत
सेलू ( प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांच्या जडण घडण व व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी स्नेहसंमेलनानिमित घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा आवश्यक असतात .असे प्रतिपादन नूतन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी परितोषक वितरण सोहळा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केले . येथील के बा विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे परितोषक वितरण सोहळा प्रसंगी ते बोलत होते यावेळी अध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्ष ऍड अनिरुद्ध जोशी हे …
Read More »मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत- प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार
पुर्णा :(सुशिलकुमार दळवी) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद पुणे आणि शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण टप्पा क्रमांक दोन अभिनव विद्या विहार प्रशाला पूर्णा येथे दिनांक 29 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडला. या प्रशिक्षण स्थळाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणीचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार आणि वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ प्रल्हाद खुणे यांनी भेट …
Read More »आखाड्यावर आग लागून दोन बैलांचा मृत्यु,धनेगाव येथील घटना
सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील धनेगाव येथे शेत आखाड्यावरील शेड मध्ये शॉट सर्किटने आग लागून झालेल्या नुकसानीत शेतकऱ्याचे २ लाख ८० हजारांचे नुकसान झाले आहे.काल रात्री साडेबारा वाजता धनेगाव शिवारातील गट नंबर १४१ मध्ये धनेगाव येथील रामभाऊ देविदासराव कटारे यांच्या आखाड्यावरील शेडमध्ये शॉट सर्किट ने अचानक आग लागली.यामध्ये १५ क्विंटल कापूस,८ क्विंटल सोयाबीन तसेच लाल कंधारी जातीची मोठी बैलजोडी जळून …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com