08/11/26
Breaking News

मराठवाडा

श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे एन.पी.टी.ई.एल (NPTEL) परीक्षेत उल्लेखनीय यश

परभणी,दि 29 ः शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये जुलै–डिसेंबर २०२५ व जानेवारी–एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहॅन्स्ड लर्निंग (NPTEL) मध्ये श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या, विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकूण ६१ विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये यश मिळवत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. यामध्ये ०४ विद्यार्थी व प्राध्यापकांनी एलिट + सिल्व्हर, २० विद्यार्थ्यांनी एलिट तर ३७ …

Read More »

परभणी पोलिसांची मोठी कारवाई; 116 गोवंशीय जनावरांचे प्राण वाचवण्यात यश

परभणी, दि. 28 – परभणी जिल्हा पोलीस दलाने धडक कारवाई करत तब्बल 116 गोवंशीय जनावरांची सुटका करून त्यांना जीवदान दिले आहे. नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीतील नांदखेडा रोडवरील बायपासजवळील शेत परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही व्यक्तींनी ग्रीन शेड उभारून गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यासाठी त्यांना एकत्र केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार नानलपेठ पोलीस …

Read More »

 वृक्ष तोडीची तात्काळ चौकशी करून कारवाई करा, सुनील माने यांची मागणी

हिंगोली,ता 28 – हिंगोली तालुक्यातील दाटेगाव डिग्रस कऱ्हाळे राहुरी बुद्रुक राहुरी खुर्द संतुक पिंपरी या परिसरामध्ये टाटा पावर या कंपनीमार्फत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाखाली बाराशे एकरवर झालेल्या विनापरवाना वृक्षतोडीचे तात्काळ चौकशी करण्याची मागणी सुनील माने या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. शासन झाडे लावा झाडे जगवा यासाठी करोड रुपये निधी देत असते. पण टाटा पावर या सौर ऊर्जा प्रकल्पाकडून बाराशे …

Read More »

न्यायालयाचे आदेश डावलून शेतजमीन मोजणी विरुद्ध तक्रार

सेलू दि २८ ( प्रतिनिधी ) सर्व्हे नंबर मध्ये समाविष्ट सर्व शेतकऱ्यांना नोटीस देऊन जमीन मोजणी करण्या बाबत तालूका सत्र न्यायालयाचे आदेश असताना ते डावलून तालूका भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी शेख व कटारे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी मौजे डीग्रस (बु) ता. सेलू येथील गट क्रमांक ७६ मधिल शेत जमीन गैर मार्गाचा अवलंब करून मोजणी केल्या बाबतची तक्रार उपविभागीय अधिकारी सेलू यांच्या …

Read More »

देऊळगाव गात येथील सिमेंट काँक्रीटचे रस्त्याचे उदघाटन

सेलू ( प्रतिनिधी ) देऊळगाव गात येथे सिमेंट रस्त्याची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती . शिवसेना पक्षाचे माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या प्रयत्नातून या कामाला गती मिळाली असून या रस्त्यांचे भूमिपूजन दि २५ मे गुरुवार रोजी सकाळी मा. आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते पार पडले . या रस्त्याच्या कामासाठी हनुमान गात यांनी पाठपुरावा केला होता. देऊळगाव गात येथील …

Read More »

कळमनुरी मर्डर प्रकरणातील दोन फरार आरोपी जेरबंद वाशिम-अकोला महामार्गावर पाच तास नाकाबंदी

 हिंगोली | प्रतिनिधी कळमनुरी शहरातील साईनगर परिसरात युवकाची दगडाने ठेचून हत्या झालेल्या खळबळजनक प्रकरणातील फरार दोन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अखेर जेरबंद केले आहे. वाशिम-अकोला महामार्गावर तब्बल पाच तास नाकाबंदी करून ही धडक कारवाई करण्यात आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 22 मे 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कळमनुरी येथील साईनगर परिसरातील खुल्या मैदानात एका युवकाची डोक्यात …

Read More »

यशवंत सेनेची उद्या निर्णायक पत्रकार परिषद नगरपालिकेतील ‘अंधारातले व्यवहार’ उघडकीस येणार?

गंगाखेड प्रतिनिधी : गंगाखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नगरपालिकेच्या अंतर्गत कारभारात सुरू असलेल्या घडामोडींनी आता गंभीर वळण घेतले आहे. स्वाक्षरीवरून सुरू झालेला वाद, सर्वसाधारण सभेत मांडलेल्या ठरावांना झालेला ठोस विरोध, तसेच प्रशासकीय काळात ३० ते ३५ जणांची विविध पदांवर झालेली भरती — या सर्व बाबी आजवर संशयाच्या भोवऱ्यातच होत्या. मात्र आता यशवंत सेना या सर्व प्रकरणांचा पडदा फाश करण्याच्या तयारीत असल्याचे …

Read More »

हराळ ते खंडाळा रस्ता कामासाठी ३४० कोटींचा निधी मंजूर,आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना यश

हिंगोली,दि 28(प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे अधिक बळकट करण्यासाठी आणि दळणवळण सुलभ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या हराळ-वरखेडा-केंद्रा-गोरेगाव-चोंडी-मालसेलू-खंडाळा ते राष्ट्रीय महामार्ग १६१ या रस्ता कामासाठी शासनाने तब्बल ३४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिली आहे. या निधी अंतर्गत ३५.७० किलोमीटर लांबीच्या सिंमेट रस्त्याचे काम केले जाणार आहे.हा रस्ता हिंगोली विधानसभा मतदारसंघातील अनेक …

Read More »

अवैध दारु विक्री विरोधात  छापेमारी करून 28 गुन्हे दाखल

हिंगोली,ता 27 ः हिंगोली जिल्ह्यात  विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करत अवैध दारु विक्री विरोधात कारवाई करत 28  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्छाटन करण्यासाठी डॉ नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या करून अवैध धंद्यांवर कठोर प्रहार करीत आहेत.परंतु डॉ. नीलाभ रोहन यांनी अचानकपणे सर्व ठाणेदाराला सूचना दिली व एकाच वेळी पूर्ण जिल्ह्यात …

Read More »

पोलीस उप महानिरीक्षक  शहाजी उमाप  यांची हिंगोलीत भेट

हिंगोली,दि 27 नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हिंगोली जिल्हा पोलीस दलास भेट देऊन मासिक गुन्हे आढावा बैठक घेतली व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, शाखाप्रमुख यांना सूचना दिल्या, तसेच पोलीस स्टेशन स्तरावर काही अडीअडचणी असल्यास सांगण्याबाबत सुद्धा ठाणेदार यांना सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था गुन्हे निर्गती व इतर सर्व बाबीचा आढावा घेऊन हिंगोली पोलीस घटकाच्या कामकाजाबद्दल …

Read More »