हिंगोली | प्रतिनिधी कळमनुरी शहरातील साईनगर परिसरात युवकाची दगडाने ठेचून हत्या झालेल्या खळबळजनक प्रकरणातील फरार दोन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अखेर जेरबंद केले आहे. वाशिम-अकोला महामार्गावर तब्बल पाच तास नाकाबंदी करून ही धडक कारवाई करण्यात आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 22 मे 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कळमनुरी येथील साईनगर परिसरातील खुल्या मैदानात एका युवकाची डोक्यात …
Read More »Shabdraj
यशवंत सेनेची उद्या निर्णायक पत्रकार परिषद नगरपालिकेतील ‘अंधारातले व्यवहार’ उघडकीस येणार?
गंगाखेड प्रतिनिधी : गंगाखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नगरपालिकेच्या अंतर्गत कारभारात सुरू असलेल्या घडामोडींनी आता गंभीर वळण घेतले आहे. स्वाक्षरीवरून सुरू झालेला वाद, सर्वसाधारण सभेत मांडलेल्या ठरावांना झालेला ठोस विरोध, तसेच प्रशासकीय काळात ३० ते ३५ जणांची विविध पदांवर झालेली भरती — या सर्व बाबी आजवर संशयाच्या भोवऱ्यातच होत्या. मात्र आता यशवंत सेना या सर्व प्रकरणांचा पडदा फाश करण्याच्या तयारीत असल्याचे …
Read More »हराळ ते खंडाळा रस्ता कामासाठी ३४० कोटींचा निधी मंजूर,आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना यश
हिंगोली,दि 28(प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे अधिक बळकट करण्यासाठी आणि दळणवळण सुलभ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या हराळ-वरखेडा-केंद्रा-गोरेगाव-चोंडी-मालसेलू-खंडाळा ते राष्ट्रीय महामार्ग १६१ या रस्ता कामासाठी शासनाने तब्बल ३४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिली आहे. या निधी अंतर्गत ३५.७० किलोमीटर लांबीच्या सिंमेट रस्त्याचे काम केले जाणार आहे.हा रस्ता हिंगोली विधानसभा मतदारसंघातील अनेक …
Read More »अवैध दारु विक्री विरोधात छापेमारी करून 28 गुन्हे दाखल
हिंगोली,ता 27 ः हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करत अवैध दारु विक्री विरोधात कारवाई करत 28 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्छाटन करण्यासाठी डॉ नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या करून अवैध धंद्यांवर कठोर प्रहार करीत आहेत.परंतु डॉ. नीलाभ रोहन यांनी अचानकपणे सर्व ठाणेदाराला सूचना दिली व एकाच वेळी पूर्ण जिल्ह्यात …
Read More »पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांची हिंगोलीत भेट
हिंगोली,दि 27 नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हिंगोली जिल्हा पोलीस दलास भेट देऊन मासिक गुन्हे आढावा बैठक घेतली व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, शाखाप्रमुख यांना सूचना दिल्या, तसेच पोलीस स्टेशन स्तरावर काही अडीअडचणी असल्यास सांगण्याबाबत सुद्धा ठाणेदार यांना सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था गुन्हे निर्गती व इतर सर्व बाबीचा आढावा घेऊन हिंगोली पोलीस घटकाच्या कामकाजाबद्दल …
Read More »कमला एकादशीनिमित्त सेलूत “संगीत संध्या “
सेलू ( प्रतिनिधी ) जेष्ठ नागरिक सेवा संघ ,सेलू तसेच शांतीदूत परिवार पुणे शाखा सेलू तसेच शाम ए सरगम संगीत परिवार ,सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने कमला एकादशीचे निमित्त ” भजन संध्या ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . रायगड कॉर्नर येथील श्री स्वामी समर्थ उद्यान केंद्रात दि २७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक सेवा संघाचे …
Read More »हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ‘टॉवर’ सज्ज; शहराच्या वैभवात पडणार भर!
बाळु जाधव हिंगोली,दि 27 शहराच्या वैभवात आणि आधुनिकतेत भर घालणाऱ्या एका भव्य गृहनिर्माण प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदान परिसराच्या बाजूला असलेल्या जुन्या पोलीस वसाहतीचा पूर्णपणे कायापालट करण्यात आला असून, त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आधुनिक आणि सुसज्ज अशा बहुमजली (टोलजंग) इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले आहे. या नव्या इमारतींमुळे पोलीस बांधवांच्या हक्काच्या आणि …
Read More »हिंगोली खरेदी-विक्री संघावर भाजप प्रणित पॅनेलचा एकहाती विजय
हिंगोली (प्रतिनिधी): हिंगोली तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि स्थानिक महायुती पुरस्कृत पॅनेलने एकहाती सत्ता काबीज करत एकहाती विजय मिळवला आहे. निवडणुकीच्या एकूण १५ जागांपैकी १० जागांवर पक्षाने आधीच बिनविरोध विजय मिळवला होता. तर उर्वरित जागांच्या मतमोजणीत आज भाजप प्रणित पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून विरोधकांचा सुपडा साफ केला. या शानदार यशानंतर आमदार तान्हाजीराव …
Read More »पाणीपुरवठा योजना आढावा बैठक- गंगाखेडकरांना दिलासा देणारी आशादायी घडामोड
गंगाखेड / प्रतिनिधी शहरातील सततच्या पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक संकेत देणारी बैठक आज पालिकेत पार पडली. नगराध्यक्षा उर्मिला केंद्रे यांच्या दालनात त्यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाची सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण, गळती दुरुस्ती, वितरण व्यवस्थापन आणि पुढील काळातील ठोस नियोजन—या सर्व मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना स्पष्ट दिशा देण्यात आली. बैठकीत शहरातील विविध भागांत कमी दाबाने …
Read More »गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी; विराट राष्ट्रीय लोकमंचचे निवेदन
हिंगोली | प्रतिनिधी गोवंश, गोरक्षण आणि गोहत्या या मुद्द्यांवरून देशात वाढत चाललेले राजकारण, सामाजिक तणाव आणि अप्रिय घटना रोखण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावे, अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच काऊन्सिल (NGO) हिंगोलीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भारत हा कृषिप्रधान आणि संस्कृतीप्रधान देश …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com