04/02/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

माजी आमदार लहाने यांच्या कडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदत

सेलू / नारायण पाटील – माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपले एक महिन्याचे पेन्शन अतिवृष्टीग्रस्तांसाठी देऊन दायित्व जपले आहे. सदरील एक महिन्याच्या निवृत्ती वेतनाचा धनादेश त्यांनी नुकताच मुबंई येथील शिवसेना बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कडे सुपूर्द केला आहे. यावेळी आ .अर्जुन खोतकर ,हेमंत पाटील ,राजू कापसे ,आनंद भरोसे ,संदीप लहाने ,बाबा काटकर ,अविनाश शेरे ,सखुबाई …

Read More »

मुख्यमंत्री सोडुन संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा..

 ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्राशेजारील गुजरातमध्ये राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे.   गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत. नवीन मंत्रिमंडळ स्थापनेची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पटेल गुरुवारी  रात्री राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतील आणि नवीन सरकार स्थापनेचा दावा करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन मंत्र्यांचा …

Read More »

ज्ञानतीर्थ युवक महोत्सवात श्री शिवाजी विधी महाविद्यालयाचे यश

परभणी,दि 16  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि ग्रामीण तंत्रज्ञान महाविद्यालय विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे झालेल्या ज्ञानतीर्थ युवक महोत्सव २०२५ मध्ये श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी यांनी वक्तृत्व, वाद विवाद, मूक अभिनय, चित्रकला ,कोलाज, पोस्टर मेकिंग , व्यंग्यचित्रकला,कथाकथन, मेहंदी ,रांगोळी आणि कलात्मक जुळवणी इत्यादी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला . विधी महाविद्यालयाचा ११ विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता .या …

Read More »

वाचकांची व विद्यार्थ्यांची पाऊले ग्रंथालयाकडे वळावीत – उपेंद्र बेलुरकर

सेलू ( प्रतिनिधी ) वाचक- विद्यार्थी यांचे पाऊले ग्रंथालयाकडे वळली पाहिजेछ तरच वाचन संस्कृती टिकेल.वाचन संस्कृतीत वाढ व्हावी,वाचन संस्कार रुजावेत यासाठी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय,सेलू नेहमीच पुढाकार घेत असते त्या बद्दल ग्रंथालयाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहेत असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे उपेंद्र बेलुरकर यांनी (ता.१५) बुधवार रोजी केले. अभिजात भाषा सप्ताह व वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथालयाने आयोजित …

Read More »

शिक्षक म्हणजे सृजनशीलता व सकारात्मक ऊर्जेचा स्रोत -डॉ.हेमंत वैद्य

सेलू /प्रतिनिधी – विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानत शिक्षकांनी त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करावेत.विध्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर असतो. विद्यार्थी हे अनुकरणीय असतात.नवनिर्मिती क्षमता व सृजनशीलता तसेच सकारात्मक दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी सदैव प्रयत्नशील असावे असे प्रतिपादन भा. शि.प्र.संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी विवेकानंद विद्यालय सेलू आयोजित सत्रांत (१५ ऑक्टोंबर) बैठकीत बोलताना केले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी,उपेंद्र बेल्लूरकर,करुणा कुलकर्णी,मु.अ.शंकर शितोळे यांची व्यासपीठावर उपस्थिती …

Read More »

अर्णव तुकाराम पौळ याची आदर्श सैनिकी स्कूल सोलापूर येथे निवड

पाथरी,दि 14 (प्रतिनिधी) ऑल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून अर्णव तुकाराम पौळ याची आदर्श सैनिकी स्कूल, सोलापूर येथे निवड झाली आहे. विशेष त्याचे पहिले ते पाचवी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळा बोरगव्हान येथे झाले सहावी पासून पुढे तो सैनिकी स्कुलला शिक्षण घेईल अर्णवने कठोर परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास व पालकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर हे यश मिळवले. त्याच्या …

Read More »

सेवेत मिळालेल्या कामाचा संधी म्हणून स्वीकार केला . शंकर शितोळे

सेलू,दि 14 (प्रतिनिधी)ः शिक्षण क्षेत्रात मिळालेल्या कामाचा मी संधी म्हणून स्वीकार केला व विद्यार्थ्यांना दैवत मानून त्यांच्या यशातच आपले यश समजले .यासाठी मला संस्थेचे कार्यकारी मंडळ व शिक्षकांचे खूप सहकार्य मिळाले .असे विचार निवृत्त मुख्याध्यापक शंकर शितोळे यांनी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केले . विवेकानंद प्राथमिक विद्यालय व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांच्या वतीने सेवानिवृत्त विवेकानंद प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक …

Read More »

खऱ्या पुरग्रस्तांना डावलले,उमरा येथील पुरग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा

रमेश बिजुले पाथरी,दि 14 ः उमरा ता.पाथरी येथे गोदावरी नदीच्या काठावरील पुरग्रस्तांना डावलुन भलत्याच लोकांची नावे नुकसानग्रस्तांच्या यादीत टाकत खऱ्या पुरग्रस्तांना लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोप नागरीकांना केला असून याबाबत पाथरी येथे तहसिलदारांना निवेदन दिले आहे. उमरा येथे अनेकांच्या घरात गोदावरी नदीला आलेले पुराचे पाणी घरात घुसले होते त्यात त्यांचे सर्व अन्न धान्य भिजून खराब झाले त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. गावातील …

Read More »

पुस्तक वाचन ही काळाची गरज – सुमिता सबनिस

सेलू : पुस्तके हे आपल्याला खूप मौल्यवान गोष्टी देतात. वाचनातून संस्कार होतात. आजच्या सोशल मीडिया, मोबाईलच्या काळात पुस्तक वाचन ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन कवयित्री सुमिता सबनिस यांनी केले. त्या नूतन विद्यालयातील ग्रंथालय, मराठी वाङमय विभाग, सांस्कृतिक विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती १५ ऑक्टोबरचे औचित्य साधून प्रशालेच्या ग्रंथालयात मंगळवार ( दि. १४) ऑक्टोबर …

Read More »

आता झेडपीत 5, पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्य,बावनकुळे यांची मागणी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कायद्यात बदल करून जिल्हा परिषदेत 5 व पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची मागणी केली आहे. बावनकुळे यांची ही मागणी सभागृहातील पक्षीय संख्याबळाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. झेडपीत 5, पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्य हवेत चंद्रशेखर बावनकुळे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. …

Read More »

सेलू नगर परिषदेच्या मतदारयाद्या मध्ये प्रचंड गोंधळ

मतदारांची पळापळ तर प्रशासनाची धावपळ सेलू ( नारायण पाटील ) – नुकत्याच होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांच्या प्रभागनिहाय मतदार याद्या नगर परिषदेकडून प्रसिद्ध झाल्या असून त्यांची पाहणी केली असता यामध्ये प्रचंड घोळ असल्याचे दिसून येत आहे . सदरील याद्या दुरुस्त करण्यासाठी मतदारांकडून आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया चालू झाली आहे .यासाठी शेवटची तारीख १३ ऑक्टोबर होती .परंतु निवडणूक आयोगाकडून ही तारीख …

Read More »

पूर्णा पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत

पूर्णा:(सुशीलकुमार दळवी) पूर्णा पंचायत समितीच्या बारा गणांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (दि.13) दुपारी तीन वाजता पूर्णा येथील तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले यांच्या प्रमुख उपस्थित काढण्यात आली. यावेळी तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे व्यंकटेश जेजुरवार आदीची उपस्थिती होती. यावेळी गणांच्या आरक्षणाची सोडत एका लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी काढून करण्यात आली. या आरक्षणात पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी, फुलकळस, वझूर, गौर …

Read More »

बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

पुणे,दि 13 ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मोठी घोषणा केली आहे. दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2025- 26 मधील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे …

Read More »

परभणी जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण निश्चीत,वाचा सविस्तर

परभणी, दि. 13 परभणी जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2025 अन्वये आरक्षण कार्यक्रम दिल्याप्रमाणे परभणी जिल्हा परिषदेच्या एकूण 54 निवडणूक विभागाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला. त्यानुसार निवडणूक विभागास आरक्षण …

Read More »

 वरद लांडगेची चमकदार कामगिरी; विभागीय जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – परळी येथील न्यू हायस्कूल शाळेचा विद्यार्थी चिरंजीव वरद श्रीराम लांडगे (इयत्ता आठवी) याने विभागीय जलतरण स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. फक्त पहिल्याच प्रयत्नात विभागीय विजेतेपद मिळवून वरदने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून हा परळी तालुका व न्यू हायस्कूल शाळेसाठी अभिमानाचा क्षण ठरला असून आगामी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये तो आता बीड जिल्ह्याचे …

Read More »