04/02/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

संत जनाबाई मंदिर विकास आराखड्याची मंजुरी अंतिम टप्प्यात

आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या लक्षवेधीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लेखी उत्तर गंगाखेड / प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा – नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी विधानसभा नियम १०५ अन्वये नगर विकास विभागाकडे लक्षवेधी सूचना क्रमांक ५७२ मांडली होती. त्यात गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सादर केलेल्या आराखड्याच्या मंजुरीबाबत विचारणा करण्यात आली होती. …

Read More »

जीवघेणा ठरत असलेल्या मांजाची सेलूत कसून तपासणी सुरू

पोलीस प्रशासनाची शहरात झडती मोहीम सेलू / प्रतिनिधी – सध्या सर्वत्र पतंग उडविण्याचा हंगाम जोरात चालू असतानाच नायलॉन मांजाचा वाढता धोका लक्षात घेता .शहरात पोलीस प्रशासनाकडून मांजा विक्रेत्यांवर कार्यवाहीचा फास आवळणे सुरू केले असून शहरात नायलॉन गांजाच्या अनुषंगाने दुकानांची झडती मोहीम सुरू केले आहे . पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय बलभीम राऊत ,हेड कॉन्स्टेबल तेलंग व …

Read More »

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 22 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

सेलू / प्रतिनिधी – माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या “हार-तुरे-शाल, पोस्टरबाजी किंवा अन्य अनावश्यक खर्च न करता जनहितासाठी योगदान द्या” या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानुसार जिंतूर सेलू मतदारसंघातील सर्व बोर्डीकर प्रेमी तसेच आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने जमा झालेली झालेले रक्कम *22 लाख रूपयाचा धनादेश आज नागपूर येथे मा .राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या …

Read More »

घरकुलाच्या थकीत हप्ते प्रकरणी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील बऱ्याच घरकुल धारकांचे थकित हप्ते तात्काळ जमा करावे नसता ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा व्यंकटेश्वर प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आला आहे . तालुक्यातील पीएम आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, अहिल्यादेवी होळकर आवास योजना या योजनांचे हप्ते मागील अनेक महिन्यापासून जमा झालेले नाहीत या आवास योजनांचे लाभ घेणारे लोक हे वंचित व गरीब परिस्थितीचे …

Read More »

टाटा टेक्नॉलॉजीचे सीआयआयआयटी (CIIIT) केंद्र परभणीत

परभणी, दि.८ – परभणी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणारा सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग’ (Center for Invention, Innovation, Incubation and Training )(CIIIT) प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असून,  या सुमारे ११५ कोटी रुपयांच्या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे ३,००० विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ४.० युगाशी सुसंगत अत्याधुनिक तांत्रिक व उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार असून परभणीला कौशल्य विकासाच्या नकाशावर ठळक स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली …

Read More »

स्वराज्य ट्रेकर्सची साल्हेर-मुल्हेर-मोरा-हरगड गिर्यारोहण मोहीम यशस्वी

परभणी,दि.04(प्रतिनिधी) : स्वराज्य ट्रेकर्सच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांतातील सर्वात उंच किल्ला साल्हेर तसेच सालोटा, मुल्हेर, मोरा, मानगड व हरगड या खडतर गडांची गिर्यारोहण मोहीम नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. मोहिमेत परभणीतील उत्साही गिर्यारोहक सहभागी झाले. ही मोहीम साहाय्यक निबंधक माधव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व गुलाब गरुड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. शनिवारी पहाटे साल्हेर किल्ल्याची चढाई सुरू झाली. दुपारपर्यंत हा …

Read More »

सेलूतील व्यंकुशाह यात्रा महोत्सव,श्रीमद् भागवत कथेची उत्साहात सांगता

सेलू ( नारायण पाटील ) शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्गुरू व सेलू शहराचे ग्रामदैवत संत श्री गोपाळकृष्ण केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) यांच्या २२४ व्या यात्रा महोत्सव निमित्ताने आयोजित श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी, ३ डिसेंबर रोजी महाप्रसादाने झाली. या वेळी शेकडो भाविकांनी श्री दर्शन, महाप्रसादासाठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त २७ नोव्हेंबरपासून भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व …

Read More »

आता डिजिटल सातबाऱ्याला तलाठ्याच्या स्वाक्षरीची गरज नाही

राज्याच्या महसूल विभागात ‘डिजिटल क्रांती’ घडवून आणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वसामान्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे डिजिटल सातबाऱ्याला (Digital 7/12) कायदेशीर संरक्षण मिळणार असून, त्यासाठी तलाठ्याच्या सही किंवा शिक्क्याची गरज उरलेली नाही. या निर्णयामुळे नागरिकांना सातबाऱ्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवण्याची भासणार नाही. गावागाड्यात ‘जो लिहील तलाठी, तेच येईल भाळी’ अशी एक म्हण प्रचलित होती. सातबारा …

Read More »

हिवाळी अधिवेशन केवळ ८ दिवस…तारीख जाहीर..

मुंबई,दि 03 ः महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन यंदा नेहमीप्रमाणे नागपूरमध्ये होणार आहे मात्र हे अधिवेशन केवळ ८ दिवस चालणार असल्याची माहिती समोर आली आहे. अधिवेशनात अतिवृष्टी ते शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखे महत्त्वाचे मुद्दे गाजणार आहे. आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ ते १४ डिसेंबरदरम्यान हे अधिवेशन चालणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान हिवाळी अधिवेशन हे …

Read More »

उद्याची मतमोजणी रद्द..आता 21 डिसेंबरला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ताण-तणाव वाढत असताना, मतमोजणीच्या तारखेबाबत आता मोठा संभ्रम निर्माण दूर झाला आहे. सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल, असे सांगितले होते. मात्र काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने आयोगाने आपल्या कार्यक्रमात बदल करत, ज्या ठिकाणी वाद सुरू आहे, तेथे 20 डिसेंबर मतदान व 21 डिसेंबरला निकाल असा …

Read More »

ज्येष्ठ गायिका गोदावरीताईं मुंडे यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार

गंगाखेड – प्रतिनिधी वारकरी संप्रदायातील भक्तिगीतांचा मधुर झंकार आणि पारंपरिक गायनशैलीला आपल्या कंठातून अप्रतिम उंचीवर नेणाऱ्या ज्येष्ठ गायिका श्रीमती गोदावरी ताई मुंडे यांना यंदाचा महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाला असून गंगाखेडसह परभणी जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गंगाखेड तालुक्यातील बडवणी येथे २१ जून १९७४ रोजी जन्मलेल्या गोदावरी ताईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द, चिकाटी आणि अथक श्रमाच्या बळावर आपली …

Read More »

पालम येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतची बैठक संपन्न

पालम,दि 01 (प्रतिनिधी) अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका शाखा पालम यांच्यावतीने चक्रधर वाचनालयाच्या सभागृहात जिल्हा उपाध्यक्ष भगवान करंजे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 1 डिसेंबर सोमवार रोजी बैठक संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायत पालम तालुका अध्यक्ष मोतीराम शिंदे यांनी बैठकीत मागील केलेल्या कामाचा आढावा सादर केला. या बैठकीत …

Read More »

सेलू पालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ५० पथके रवाना, चोख पोलीस बंदोबस्त

सेलू ( प्रतिनिधी ) नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या नगराध्यक्ष आणि २६ नगरसेवक पदाच्या जागेसाठी मंगळवारी, २ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० ते ५:३० या वेळेत मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण ५० केंद्रावरील मतदान पथके सोमवारी रवाना झाली असून सर्व मतदान केंद्रे व यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण ४४ हजार ९९३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २२ हजार ५९६ …

Read More »

स्माईल शिल्ड दंत व मुखरोग दवाखान्यात लेझर मशीन सुविधा उपलब्ध

सेलू / प्रतिनिधी – येथील बाबासाहेब मंदिर रोडवरील डॉ निरज परशराम चचेडिया यांच्या स्माईल शिल्ड दंत व मुखरोग रुग्णालयात रुग्णांसाठी आरोग्य सेवेचे एक नवीन पर्व सुरू करण्यात आले असून त्याचा मोठा फायदा दंत व मुखरोग असलेल्या रुग्णांना वरदानच ठरणार आहे . यामध्ये रुग्णांवर लेझर मशीन ,वेलोस्कोप डायग्नोस्टिक तसेच ओझोन इन्फ्युजन मशीन च्या सहाय्याने नवीनतम तांत्रिक प्रगतीतून उपचार केले जाणार आहेत …

Read More »

पूर्णा येथील शासकीय निवासी शाळेत बालसभा

पुर्णा,दि 29 ः 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने शासकीय निवासी शाळा पूर्णा येथे बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इयत्ता सहावीच्या वर्गातील शिवप्रसाद बिरंगने या विद्यार्थ्याने भूषवले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वराज धुराजी ढगे याने केले. तर संविधान साळवे, रत्नदीप नरवाडे, लंकेश आटकोरे,सतीश लोंढे यांनी आपले मनोगत …

Read More »