17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

राणी सावरगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

गंगाखेड (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद परभणीचे राणी सावरगाव गटाचे सदस्य सय्यद अल्ताफ यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी गुंजेगाव पॉईंट येथील पांडुरंग फंक्शन हॉलमध्ये आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण २९२ व्यक्तींनी नेत्र तपासणी करून घेतली. त्यापैकी ६१ व्यक्तींची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून ५१ जणांना औषधोपचार देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

मसापचा ८३ वा वर्धापनदिन व निमंत्रितांचे कवी संमेलन संपन्न

हिंगोली,दि 28 मराठवाडा साहित्य परिषदेचा ८३ वा वर्धापनदिन आणि त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेले कवी संमेलन रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी उज्वल इंग्लिश स्कूल येथे उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म सा प चे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक बाबाराव मुसळे (वाशीम) हे होते. मसापचे कार्यवाह डॉ. दादा गोरे,उपाध्यक्ष डॉ. आसाराम लोमटे, रामचंद्र तिरुके,डॉ. रामचंद्र काळुंखे, …

Read More »

मीरा कदम यांनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

हिंगोली,दि 28 (प्रतिनिधी) इसापूर रमणा येथील शेतकरी विठ्ठल वाढवे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली.  या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या सौ. मीरा कदम आणि धनराज कदम यांनी तातडीने वाढवे कुटुंबाची भेट घेतली.याच भेटीत मिरा कदम यांनी या कुटुंबातील शरद आणि अंकिता या दोन्ही चिमुकल्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची घोषणा केली. सेवासदनच्या माध्यमातून या लेकरांना शिक्षणासाठी बळ देण्याचा प्रयत्न …

Read More »

दुष्काळ जाहीर,२६५ तालुक्यांचा समावेश,विविध सवलती आणि उपाययोजना जाहीर

: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक अत्यंत मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ‘ट्रिगर १’ लागू झालेल्या या २६५ तालुक्यांचा समावेश असून, याचाच अर्थ राज्यातील सुमारे ७५ टक्के भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करत दुष्काळ निवारणासाठी …

Read More »

यूपीआय व्यवहारा बाबत महत्वाची अपडेट….आली माहीती..

केंद्र सरकार आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं येत्या 15 ऑक्टोबर 2026 पासून ‘पर्सन-टू-मर्चेंट’ (P2M) यूपीआय व्यवहारांवर 0.04 टक्के मर्चंट डिस्काउंट रेट वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क केवळ दुकानदारांना म्हणजेच मर्चंटसना बँक आणि सर्विस प्रोवाइडर्सला द्यावे लागेल. एमडीआरचा भार ग्राहकांवर पडणार नाही, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. एमडीआरवर 18 टक्के जीएसटी आकारला जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. …

Read More »