24/03/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

विमानाचा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याची शक्यता

पुणे,दि 16 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार मुंबईवरून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळावर उतरताना विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान जमिनीवर जोरात आदळले. त्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. या अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला. मात्र तो जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर …

Read More »

नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!’विज्ञानवारी’ लेव्हल–III साठी जिल्हास्तरीय फेरीसाठी निवड

सेलू (प्रतिनिधी): परभणी येथील परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञानवारी पात्रता पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय परीक्षेत नूतन विद्यालय, सेलू येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची तृतीय फेरी (लेव्हल–III) जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे. विज्ञानवारी सेलू तालुकास्तरीय परीक्षेत सान्वी गजानन शितळे हिने प्रथम क्रमांक,तन्मय …

Read More »

कायदे विषयक महा शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या २०० स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग

गंगाखेड,दि 16 ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी तथा तालुका विधी सेवा समिती गंगाखेड व जिल्हा प्रशासन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.१४ फेब्रुवारी शनिवार) रोजी कापसे गार्डन,गंगाखेड येथे शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा तसेच कायदे विषयक महा शिबिर उत्साहात संपन्न झाले. …

Read More »

सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,सेलूतील शिवजन्मोत्सव सोहळा समितीचा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त नूतन विद्यालय व नूतन प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा ( वर्षे दुसरे )इयत्ता चौथी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रविवार ( दि. १५ ) रोजी संपन्न झाली. तीन गटात संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी …

Read More »

अजित पवारांच्या मृत्यूच्या चार दिवसांत 75 संस्थांना अल्पसंख्यांक मान्यता

राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असताना अल्पसंख्यांक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांतच प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाल्याचा आरोप होत आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती होती. तरीही ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे मान्यता देण्यात आल्याचे बोलले जात आहे. दुखवट्याच्या …

Read More »

…तर होणार लाडक्या बहिणींच्या खात्यात 6000 हजार रुपये जमा

: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 6000 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जमा होण्याची तारीख देखील समोर आली आहे. महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेचा मासिक लाभ (₹१,५००) मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आता पूर्णपणे अनिवार्य झाले आहे. …

Read More »

बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समितीची स्थापना; अध्यक्षपदी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, सदस्यपदी प्रविण काबरा

गंगाखेड / प्रतिनिधी – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या आदेशानुसार गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी ‘बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समिती’ची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. रत्नाकर गुट्टे यांची नियुक्ती करण्यात आली असून, सदस्यपदी प्रविण शांतिलाल काबरा यांची निवड करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच दि. १० फेब्रुवारी …

Read More »

उज्जेनला निघालेल्या गंगाखडेच्या चार तरुणांचा अपघातात जागीच मृत्यु

जिंतूर (परभणी):देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीला जिंतूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अकोली पुलावर भीषण अपघात झाला. बुधवारी (१२ फेब्रुवारी) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास झालेल्या या अपघातात गंगाखेड येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ​पुलावर आदळली सुसाट कार मिळालेली माहिती अशी की, गंगाखेड येथील पाच मित्र एर्टिगा कारने (क्रमांक MH 14 KF 2790) उज्जैनला देवदर्शनासाठी जात होते. जिंतूर …

Read More »

महापौरपदी शिवसेना ठाकरे सेनेचे सय्यद इकबाल खाजा

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या परभणी महापालिकेच्या महापौरपदी शिवसेना ठाकरे सेनेचे सय्यद इकबाल खाजा विराजमान झाले. परभणीत मुस्लिम नगरसेवकांची अधिक संख्या लक्षात घेऊन शिवसेना पक्षाने मुस्लिम चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला. परभणीत महापौरपदासाठी गुरूवारी निवडणूक संपन्न झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काम पाहिले. शिवसेना-काँग्रेसकडे बहुमत असल्याने दोन्ही पक्षांच्या आघाडीने सत्ता स्थापन केली. त्या अनुषंगाने परभणीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक …

Read More »

गाई व गोवंश चोरून नेणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलूची मागणी

सेलू / प्रतिनिधी – सेलू व परिसरामध्ये गाई चोरून नेणारी टोळी सक्रिय झाली आहे. सेलू शहरातून व आजूबाजूच्या गावातून अनेक गाई चोरी गेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने गाईला व गोवंशाला संरक्षित म्हणून घोषित केले आहे. तसेच महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. ही चोरून नेलेली गाई व गोवंश बहुतेक कापण्यासाठी नेली जात असतील अशी शक्यता आहे. अशी दुभती जनावरे चोरून नेल्यामुळे …

Read More »

फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

१२ ते १९ मार्च दरम्यान पारायण सोहळा; स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या महाभारत कथेचे आयोजन सेलू ,दि ११ ( प्रतिनिधी) – शहरातील सातोना रोडवरील मयुरी पार्क परिसरात १२ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित ‘फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा’ आणि स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून आयोजित महाभारत कथा सोहळ्याच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. या सोहळ्याचे …

Read More »

३२ वर्षांनंतर पुन्हा भरली ‘मैत्रीची शाळा’; १९९२ च्या बॅचच्या स्नेहसंमेलनात आठवणींना फुटला पाझर

परभणी – वेळ कधीच थांबत नाही; मात्र काही आठवणी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरही तितक्याच ताज्या राहतात. याचाच प्रत्यय नुकताच जिल्हा परिषद प्रशाला (प्राथमिक) येथील १९९२ च्या दहावीच्या बॅचच्या स्नेहसंमेलनात आला. तब्बल ३२ वर्षांनंतर एकत्र आलेल्या बालमित्रांनी आपले वय, पद आणि प्रतिष्ठा क्षणभर बाजूला ठेवत पुन्हा एकदा बालपणाचा निखळ आनंद अनुभवला.   गुरुजनांच्या आशीर्वादाने उजळला सोहळा या स्नेहमेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे लाभलेले …

Read More »

शिक्षक नारायण सोळंके व रोहिदास मोगल यांचा सेवागौरव

सेलू  / प्रतिनिधी – येथील नूतन विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक नारायण सोळंके आणि पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवागौरव समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, सीताराम मंत्री, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता, मुख्याध्यापक संतोष पाटील, किरण देशपांडे व शंकरराव बोधनापोड, जयदत्त …

Read More »

जिल्हास्तरीय तीसऱ्या अक्षर बाल साहित्य संमेलनासाठी के बा च्या विद्यार्थिनींची निवड

आराध्या कटारे व दाक्षायनी इघवे यांची स्वरचित काव्य वाचन तर अंकिता फड हिची कथाकथन साठी निवड सेलू / प्रतिनिधी – येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील इयत्ता सहावी अ च्या ६ विद्यार्थिनींची परभणी जिल्हास्तरीय तीसरे अक्षर आनंद बाल साहित्य संमेलनासाठी निवड झाली आहे. दि. १५ जुन २०२५ ते दि.३ जानेवारी २०२६ दरम्यान राबवण्यात आलेल्या अक्षर आनंद बाल वाचक पुस्तक वाचन मोहिमे …

Read More »

तब्बल ७० हजार सरकारी जागांची मेगाभरती

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारने एक मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्र प्रशासनातील रिक्त पदांची कोंडी फोडण्यासाठी तब्बल ७० हजार सरकारी जागांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उच्च शिक्षण क्षेत्रातील ५,५०० प्राध्यापक पदांचाही समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आचारसंहितेचा अडथळा दूर होताच या प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये …

Read More »