07/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

शिवसेनेच्या 6 खासदारांचा पक्षप्रवेश अडचणीत? अरविंद सावंतांचा लेटरबॉम्ब, अपात्रतेची शक्यता

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पक्षाच्या सहा खासदारांना पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. या पत्रात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कोणत्याही राजकीय पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहा खासदारांच्या विलीनीकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १३ जुलै २०२६ रोजी संसदीय …

Read More »

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

दापचरी येथे उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार. दुग्ध प्रकल्पाची ५५८.४३ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय. पालघर जिल्ह्यातील मौजे दापचरी ( ता.डहाणू) येथील दुग्ध प्रकल्पाची जमीन महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळास देण्यास मंजुरी. याठिकाणी आंतराष्ट्रीय दर्जाच्या कृषि बाजार उभारणीसह पणन विषयक सुविधा निर्माण करण्यात येणार. पालघर, ठाणेसह परिसरातील शेतकऱ्यांना सुविधेचा मोठा लाभ होणार. (सहकार व पणन) शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी …

Read More »

सोनं खरेदीची हीच सुवर्णसंधी? सोन्या-चांदीच्या दरात अचानक घसरण

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 24 कॅरेट सोनं ₹1,42,900 वर   मुंबई : मागील काही महिन्यांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठा उलटफेर सुरू आहे. सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर त्यात मोठी घसरण सुरू झाली आहे. उच्चांकी दरापासून जवळपास २० टक्क्यापर्यंत सोन्याचे दर घसरले आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असतानाच, ज्यांच्या घरात लग्नसराई किंवा इतर मोठे कार्य आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची …

Read More »

SIR 2026: मतदार यादी विशेष पुनरीक्षण म्हणजे काय? 32 FAQ, कागदपत्रे, BLO भेट आणि ऑनलाइन अर्जाची संपूर्ण माहिती

विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision) २०२६ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions) प्रश्न १: विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) म्हणजे काय व ते राबविण्याचा उद्देश काय आहे? उत्तर: राज्यातील विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अद्ययावत करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण होय. सन २००२-२००४ या कालावधीत देशात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण करण्यात …

Read More »

विद्यर्थिनींनी प्रतिकार करण्यासाठी स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करावे-रितू श्रीवास्तव

सेलू / प्रतिनिधी – सध्या विद्यर्थिनींवर अत्याचाराच्या व छेडछाडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे .त्यासाठी आपल्या सुरक्षिततेसाठी विद्यर्थिनींनी स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे .असे प्रतिपादन बोर्डीकर पोद्दार स्कुल च्या मुख्याध्यापिका रितू श्रीवास्तव यांनी एका कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना केले.   विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच संरक्षणाची भावना दृढ व्हावी या उद्देशाने पोद्दार स्कुल मध्ये कराटे ,तलवारबाजी …

Read More »

भट्ट कॉलनीतील वीज समस्या तात्काळ सोडवा; आ. तान्हाजी मुटकुळे यांचे महावितरणला निर्देश

हिंगोली / प्रतिनिधी – शहरातील भट्ट कॉलनी परिसरात मागील काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी भाजपा नेते आमदार तान्हाजी मुटकुळे यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. या तक्रारीची दखल घेत आमदार मुटकुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भट्ट कॉलनीतील वीज समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत.   भट्ट कॉलनी परिसरातील वीज पुरवठा …

Read More »

हिंगोली जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत विभागप्रमुखांचे प्रशिक्षण संपन्न!

​१६ व्या वित्त आयोगाच्या निधीचा प्रभावी वापर आणि शाश्वत विकासाच्या नियोजनावर भर; मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे प्रतिपादन ​हिंगोली – राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत पंचायत विकास आराखडा अधिक प्रभावीपणे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करण्यासाठी हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी जिल्हास्तरीय विभागप्रमुखांचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून वाढदिवस साजरा

नगरसेवक दिपक कोल्हाळ यांचा आदर्श पायंडा सेलू / प्रतिनिधी – आजच्या आधुनिक युगात सगळीकडे आपल्या पुरता स्वार्थी विचार करण्याची वृत्ती बळावत असताना वाढदिवस देखील खूप गाजावाजा करीत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.यासाठी अवास्तव खर्च देखील केला जातो . या सर्व बडेजावाला फाटा देऊन प्रभाग क्र 4 मधील नगर सेवक दिपक कोल्हाळ यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त …

Read More »

लाडकी बहीण योजना; 92 लाख लाभार्थी अपात्र, तुमचे नाव यादीत आहे का?

Ladki Bahin Yojana मुंबई – राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाभार्थ्यांची पडताळणी, ई-केवायसी (e-KYC) आणि पात्रता निकषांची छाननी पूर्ण झाल्यानंतर 92 लाखांहून अधिक लाभार्थी महिलांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सुमारे 80 लाख नावे कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र अंतिम पडताळणीनंतर हा आकडा 92 लाखांपेक्षा अधिक …

Read More »

स्मार्ट मीटर की दुसरं काही? वीजबिल वाढीचं खरं कारण आलं समोर!

Do smart meters cause bills to increase? मुंबई – राज्यात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात अचानक वाढ झाल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे ही वाढ स्मार्ट मीटरमुळेच होत असल्याचा समज सर्वसामान्यांमध्ये पसरला आहे. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत स्मार्ट मीटर नव्हे, तर वाढलेला वीज वापर आणि राज्यातील ‘टेलिस्कोपिक’ वीजदर रचना यामुळे बिल वाढत असल्याचे स्पष्ट …

Read More »

राज्यासाठी हवामानाचा नवा अंदाज; हवामान खात्याने दिला मोठा इशारा

Maharashtra Weather Update News मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावत मान्सूनने जूनमधील पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून काढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, हा दिलासा फार काळ टिकण्याची शक्यता नसून, राज्यात मान्सूनच्या प्रवासाला पुन्हा एकदा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, १० ते १५ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून …

Read More »

‘कलम १५५’ चा गैरवापर महागात! १५ महसूल अधिकारी निलंबित; काहींवर गुन्हे, तर काहींना सेवेतून बडतर्फीची तयारी

Maharashtra 15 Revenue Officers Suspended पुणे : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर करून जमिनींच्या नोंदींमध्ये बेकायदेशीर फेरफार केल्याप्रकरणी पुणे विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यासह १५ महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गंभीर दोषी आढळणाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचीही तयारी सुरू असल्याचे …

Read More »

IIT ते COEP! महाराष्ट्रातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणती?

Best Engineering / BTech Colleges in Maharashtra लेखात आपण महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग शिक्षणासाठी आघाडीची महाविद्यालये जाणून घेऊयात. १. IIT बॉम्बे (Indian Institute of Technology Bombay) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) ही इंजिनिअरिंग शिक्षणासाठी महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकावरील संस्था आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण, अत्याधुनिक संशोधन सुविधा, उत्कृष्ट प्राध्यापक आणि देश-विदेशातील आघाडीच्या कंपन्यांमधील प्लेसमेंटमुळे ही संस्था विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरते. संस्थेने ‘एनआयआरएफ …

Read More »

पहिली कर्जमाफी कोणी केली? कसा होता निर्णय….

Who implemented the first loan waiver? शेती आणि नैसर्गिक संकटे यांचे नाते फार जुने आहे. अगदी राजे-महाराजांच्या काळातही तीन वर्षांतून एकदा तरी पीक हातचे जायचे, अशी नोंद इतिहासात आढळते. त्यावेळी संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असल्याने राजे संकटाच्या काळात शेतसारा (कर) माफ करायचे. काही राजांनी तर शेतीचा विकास व्हावा म्हणून कर्ज पुरवल्याचेही दाखले आहेत. परंतु, ते तात्पुरते निर्णय होते. सध्याही हवामान …

Read More »

विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफी जाहीर

मुंबई  – राज्यातील बळीराजासाठी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी ५० हजार रुपये भरण्याची जाचक अट सरकारने पूर्णपणे काढून टाकली आहे. यामुळे राज्यातील तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील …

Read More »