16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर ‘गौरव अवॉर्ड 2026’ ने सन्मानित

परभणी | प्रतिनिधी इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र शाखा (परभणी) यांच्या वतीने आयोजित ‘गौरव अवॉर्ड 2026’ पुरस्कार वितरण व सत्कार सोहळ्यात जिल्ह्यातील सुप्रसिद्ध समाजसेवक, गोसेवक व गौरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. दि. 28 जून 2026 रोजी स्टेशन रोड, परभणी येथील हॉटेल विसावा कॅफे सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी नितीन जाधव गोगलगावकर यांना सन्मानपत्र …

Read More »

खा.संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी,परभणीत व्हॉईस ऑफ मीडियाने मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन

परभणी,दि 29 (प्रतिनिधी) पत्रकारांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने तीव्र निषेध केला असून संबंधित इशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील  यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी प्रभारी जिल्हाधिकारी नतिषा माथुर यांच्यामार्फत  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने सोमवारी (दि.29) जिल्हाधिकारी कार्यालय येथे  जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या …

Read More »

विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी 1 जुलैला निवडणूक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या उपसभापती पदासाठी येत्या 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक पार पडणार आहे. विधान परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली असून, महायुतीकडे (विशेषतः शिंदे गटाकडे) हे पद जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. निवडणुकीचा कार्यक्रम आणि नियम अर्ज दाखल करण्याची मुदत: 30 जून 2026 रोजी …

Read More »

लाखो रुपयांच्या फर्निचर कामाचा फज्जा! पहिल्याच पावसात पूर्णा तहसील कार्यालयात स्लॅब गळती

पूर्णा:(सुशील दळवी) परभणी जिल्ह्यातील पूर्णा तहसील कार्यालयात काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून विविध कार्यालयांमध्ये फर्निचरचे काम करण्यात आले. शासनाचा मोठा निधी खर्च करून कार्यालयाचे सुशोभीकरण करण्यात आले असले, तरी या कामाच्या नियोजनावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्याच पावसात नायब तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील स्लॅबमधून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली असून, पावसाचे पाणी थेट कार्यालयात झिरपत आहे. त्यामुळे …

Read More »

सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य

महाराष्ट्रातील सगळ्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवली जाणे हे अनिवार्य असेल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. दादा भुसे यांनी असंही सांगितलं की या नियमाचं कुणी उल्लंघन केलं तर त्या शाळेवर कारवाई करण्यात येईल असंही दादा भुसे यांनी म्हटलं आहे. अतुल भातखळकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली घोषणा महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी दादा …

Read More »