17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

आरटीओतील लाचखोरीवर एसीबीचा घणाघात; दोन लिपिक रंगेहात जेरबंद

परभणी / प्रतिनिधी – परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात मोटारसायकल नावावर करून देण्याच्या कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी (दि. ३ जुलै) यशस्वी सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.   लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २८ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये खरेदी केलेली मोटारसायकल स्वतःच्या नावावर करण्यासाठी …

Read More »

तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता दूध सम्राटांकडे,कडक नियमावली जाहीर

राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे सत्र सुरूच असून, हॉटेल, बेकरी आणि पनीर विक्रेत्यांनंतर आता त्यांनी आपला मोर्चा राज्यातील ‘दूध सम्राटांकडे’ वळवला आहे. दुग्धजन्य पदार्थांमधील वाढती भेसळ आणि ग्राहकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी मुंढे यांनी राज्यात ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत दूध संकलनापासून ते थेट ग्राहकांच्या ताटात …

Read More »

मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण

हिंगोली : शासनाने विविध नागरिकांसाठी प्रवासात सवलत दिली असून काहींना मोफत प्रवास देण्यात येत आहे. मात्र, हिंगोली आपल्या साथीदारासह वाहकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बसमधील (Bus) काही प्रवाशांनी एसटी बसच्या वाहकावर धारदार शस्त्र आणि पंचने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात वाहक गंभीर जखमी झाला असून संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी …

Read More »

एसटी महामंडळाची मोठी कारवाई, एकाचवेळी 11 अधिकाऱ्यांचे निलंबन

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कारभारात सुधारणा करण्यासाठी आणि प्रशासकीय शिस्त आणण्यासाठी महामंडळाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला आहे. यात अमरावती विभागातील एका आगार व्यवस्थापकासह नाशिक विभागातील तब्बल 11 अधिकाऱ्यांचा समावेश असून  या धडक कारवाईमुळे संपूर्ण एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती विभागातील परतवाडा आगाराचे व्यवस्थापक …

Read More »

रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि आयशरच्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

परभणी,दि.01(प्रतिनिधी) : परभणी ते मानवत या महामार्गावरील कोल्हा येथील रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि आयशर या दोन वाहनांच्या जोरदार धडकेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बुधवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. मानवत तालुक्यातील खरबा येथील ज्ञानेश्‍वर वैजनाथ निर्मळ व गणेश तानाजी निर्मळ हे दोघे युवक एम.एच.06 बी.एम. 6110 या क्रमांकाच्या इर्टिका कारमधून जात होते. त्यावेळी कार चालकाचे वाहनावरील …

Read More »