16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

भाजप नेत्यांनीच युतीचा गळा कापला,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांचा हल्लाबोल

परभणी,दि 30 परभणीत भाजप नेत्यांनीच युतीचा गळा कापला, असा हल्लाबोल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी चढवला आहे. स्वार्थासाठी या नेत्यांनी युती तोडली, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. परभणी महापालिकेच्या निवडणुकीत आधीच ठरलेला शिवसेना – भाजप युतीचा 13 -20 चा फार्म्युला भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. भाजपच्या नेत्यांनी केसाने गळा कापला,अशा तीव्र शब्दांत जिल्हाप्रमुख आनंद भरोसे …

Read More »

महाराज यशवंत होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळा परभणी तालुका प्रतिनिधी विष्णु सायगुंडे यांची निवड

परभणी,दि 29 (प्रतिनिधी):- श्रीमंत छत्रपती महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या राज्याभिषेक सोहळा उत्साहानिमित्त परभणी तालुका प्रतिनिधी म्हणून विष्णु सायगुंडे यांची निवड करण्यात आली आहे. वाफेगाव (या.खेड, जिल्हा पुणे) पुणे येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी दि.६ जानेवारी २६ रोजी सकाळी ११:०० वा. किल्ले वाफेगाव येथे श्रीमंत छत्रपती महाराज यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येतो,त्याच अनुषंगाने या ही विविध …

Read More »

बाबा शेख यांचे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले कौतुक

परभणी,दि 29 ः दैठणा पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिक्षक  रवींद्रसिंह परदेशी यांनी सोमवारी (दि.29)  सहारा रुग्णवाहीकेच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाणारे सामाजिक कार्यकर्ते  बाबा शेख यांचे कौतुक करत सत्कार केला. परभणी जिल्ह्यात अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी बाबा शेख यांनी व्हाटसॅप ग्रुप तयार करुन अनेकांना तातडीने उपचार मिळवुन दिला आहे.त्यांच्या कार्याची दखल पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनीही घेतली.दैठणा येथे …

Read More »

विभागीय पोस्टर स्पर्धेत कलाशिक्षक संतोष ताल्डे प्रथम

सेलू ( प्रतिनिधी ) राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, पुणे. यांच्यावतीने शिक्षकांसाठी विविध विभागीय स्पर्धांचे आयोजन 2६ डिसेंबर शुक्रवार रोजी करण्यात आले होते. शिक्षण संचालक राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून शिक्षक व अधिकारी,कर्मचारी यांच्यासाठी ४२विविध विभागीय स्पर्धां महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सध्या सुरू आहेत. संभाजीनगर विभागातील ही स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, परभणी. (डायट) येथे विभागीय पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली …

Read More »

ग्रामीण साहित्य म्हणजे वेदनेची कळ मारण्यासाठीच असत-आसाराम लोमटे

सेलू(प्रतिनिधी ) वेदनेची कळ मारण्यासाठी पूर्वीच्या काळी जुनी लोकं चटका देत असत, तसेच ग्रामीण साहित्य हे सुद्धा ग्रामीण भागातील लोकांच्या वेदनेची कळ मारण्यासाठीच असल्याचं प्रतिपादन लेखक आसाराम लोमटे यांनी केले. साहित्य अकादमी, दिल्ली व सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद प्रा. शाळा रायपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्रामालोक” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख …

Read More »