16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

वालूरच्या शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

सेलू (प्रतिनिधी ) तालुक्यातील वालूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मराठी) सीबीएसई पॅटर्न येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिन ३ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सावित्रीच्या चिमुकल्या लेकींनी आपल्या प्रभावी कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये ऋतुजा नवघरे, साधना ढवळे, धृती तळेकर, साक्षी खरबे, शुभांगी सारुक आणि साक्षी जायभाये या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. …

Read More »

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त केमापूर शाळेत गणित जत्रा

सेलू (प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिनानिमित्त गणित जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. गणित जत्रा हा विद्यार्थींच्या गणिती संकल्पना स्पष्ट होण्यासाठी उपयुक्त उपक्रम असल्याचे जेष्ठ शिक्षक नारायण अष्टकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना स्वतःपैसे खर्च करताना आणि विविध वस्तुंची खरेदी- विक्री करताना गणित विषयातील बेरीज, वजाबाकी, भागाकार,गुणाकार, किलो ग्रॅम आणि मापनाच्या क्रिया करत असताना …

Read More »

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गंगाखेड तालुका अध्यक्षपदी ॲड. संतोष मुंडे

दै. शब्दराज / गंगाखेड – राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गंगाखेड तालुका अध्यक्षपदी ॲड. संतोष मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केली आहे. अलीकडे झालेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाची नैतिक जबाबदारी …

Read More »

वालूर येथे अखंड हरिनाम सप्ताह, राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

सेलू (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे वालूर (ता. सेलू) गावातील १५ वे वर्ष असून गुरुवारी (ता. १) या भव्य सप्ताहास उत्साहात प्रारंभ झाला असून ८ जानेवारी रोजी या सप्ताहाची सांगता होणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त १ जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद्भागवत कथा व विविध धार्मिक …

Read More »

सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सेलू (प्रतिनिधी ) नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मिलिंद चंद्रकला ज्ञानदेव सावंत यांचा पदग्रहण समारंभ आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी, २ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्याला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची तसेच कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, सेलू बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोडगे …

Read More »