16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

गोवंश जनावरांची वाहतूक करणारी आठ वाहने सेलू पोलिसांनी पकडली

सेलू ( प्रतिनिधी ) शहरातील रायगड कॉर्नर या ठिकाणी दि १६ एप्रिल रोजी पहाटे पाच च्या सुमारास अवैधरित्या गोवंश जनावरे वाहतूक करीत असताना एकूण सात पिकप आणि एक आयशर अशी वाहने मिळून आल्याने त्यावरील चालकांविरोधात सेलू पोलीस स्टेशन येथे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये एकूण अकरा आरोपी असून सदर गुन्ह्यामध्ये बैल जातीचे गोवंश ४५ जनावरे जप्त करण्यात …

Read More »

एसटीच्या तिकीट दरांत भरमसाठ वाढ,सफाई खर्चाचा बोजा प्रवाशांवर

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीसाठी तिकीट दरात 10 टक्क्यांची हंगामी वाढ जाहीर केली असून, प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त 2 रुपयांचा स्वच्छता अधिभारही लागू केला आहे. या निर्णयामुळे गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल-मे महिन्यात शाळा आणि …

Read More »

सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेस १२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू दि१२ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या संकल्पनेतील महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेस तालुक्यातील १२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते पदव्युत्तर या तीन गटात शहरातील नूतन विद्यालयात रविवार ( दि. १२) …

Read More »

सेलू येथे डॉ. सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षेची प्रॅक्टिकल परीक्षा उत्साहात संपन्न

सेलू दि १२ कल्याणम् एज्युकेशन सोसायटी, परभणी यांच्या वतीने आयोजित डॉ. सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षा (शैक्षणिक वर्ष 2025–26) अंतर्गत सेकंड लेव्हल प्रॅक्टिकल परीक्षा आज दिनांक १२ एप्रिल २०२६ (रविवार) रोजी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय, सेलू येथील सायन्स लायब्ररीमध्ये उत्साहात संपन्न झाली. या परीक्षेस प्रथम स्तरावर पात्र ठरलेल्या १०३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोग सादर करत आपली …

Read More »

सेवानिवृत्त शिक्षकाची ९७ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक

सेलू ( नारायण पाटील ) येथील मौलाना आझाद नगर मधील सेवानिवृत्त शिक्षक नागनाथ शंकरराव कुरमुडले यांना आरोपितांनी वेगवेगळ्या दूरध्वनी क्रमांकावरून ८ एप्रिल रोजी आरोपीच्या दूरध्वनीवर फोन व व्हाटसपवरून व्ही डी ओ द्वारे अटक करण्याची धमकी देत ९७ लाख ८३ हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे . कुरमुडले यांच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात गु र न १८१/२०२६ नुसार सेलू पोलिसात गुन्हा नोंद …

Read More »