16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचे विचार व कार्य मानवतावादी होते : प्राचार्य डॉ. बबन पवार

परभणी,दि 26ः येथील शारदा महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने भगवान चक्रधर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.बबन पवार म्हणाले की महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक स्वामी चक्रधर यांनी जगा आणि जगू द्या असा अहिंसावादी विचार जगाला दिला. …

Read More »

परभणीत वंदे भारत एक्सप्रेसचे भाजपा महानगर कडून जल्लोषात स्वागत

परभणी ,दि 26 दक्षिण मध्य रेल्वेचा ऐतिहासिक क्षण आज मराठवाड्याने अनुभवला. हुजूर साहेब नांदेड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा शुभारंभ  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते (ऑनलाईन) हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या प्रसंगी परभणी स्थानकावर गाडीचे आगमन होताच भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. स्थानक परिसरात ढोल-ताशांचा …

Read More »

मोरेगावात वानरांचा उच्छाद; ग्रामस्थ हैराण

सेलू,दि 25 ः सेलू तालुक्यातील मोरेगावात गेल्या काही दिवसांपासून वानरांच्या टोळ्यांचा धुमाकूळ सुरू असून ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरातील धान्याची नासधूस, गोरगरिबांच्या घरावरील पत्र्यांचे नुकसान, घराच्या छतावरील सौर प्लेट फोडणे, विजेच्या तारा तोडणे, लहान लेकराच्या हातातील वस्तू हिसकावणे, घरात उतरून भाकरी पळवणे, त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येतात अनेकांची पत्रे पाडली आहेत.त्यामुळे घराच्या बाहेर निघताना भिती …

Read More »

सेलूतील जैन समाजाच्या आंतर-शालेय निबंध स्पर्धेला मोठा प्रतिसाद

सेलू,दि 25 (प्रतिनिधी) ः भगवान महावीर जन्म कल्याणकाच्या पवित्र प्रसंगी श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर,सेलू संस्थे द्वारा आयोजित आंतर-शालेय निबंध स्पर्धेत १० शाळांतील एकूण ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे पुरस्कार वितरण समारंभ यशस्वीपणे पार पडला. स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट लेखनासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ व विशेष लेखनासाठी विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम पुरस्कार म्हणून ३० ग्रॅम चांदीचे नाणे,द्वितीय पुरस्कार …

Read More »

विजयसिंह पंडित यांनी काढली थेट लक्ष्मण हाकेंची लायकी

ओबीसी नेते लक्ष्मण हाके नेहमी चर्चेत असतात. अशातच आता बीडच्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात संघर्ष पेटला आहे. बीडमध्ये दाखल झाल्यानंतर विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला केला. जोरदार घोषणाबाजी करत हाकेंच्या ताफ्यावर समर्थक धावून गेले. पण वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना पांगवलं. या घडलेल्या प्रकारनंतर विजयसिंह पंडित यांनी थेट लक्ष्मण हाकेंची …

Read More »