16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

शाळांमधून सुरक्षा समिती,तक्रारपेटी अधिक सजग होणे आवश्यक

सेलू(प्रतिनिधी.)दि 08 सेलू मध्ये पोक्सो अंतर्गत दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.यामध्ये पीडित या अल्पवयीन आहेत तर आरोपींमध्ये एका शिक्षकाचा सहभाग असल्याने शिक्षण विभागाने देखील शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या समित्या अधिक सजगपणे कार्यरत करणे आवश्यक असल्याचे मत पालकांमधून व्यक्त होत आहे. शाळा स्तरावर विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी विद्यार्थी सुरक्षा समिती,सखी सावित्री समिती ,तक्रार निवारण समिती अशा समित्या आहेत.त्यातच शाळांमध्ये …

Read More »

पाथरीत वकिल संघाने केला  बाबाजानी दुर्राणी यांचा  सत्कार

रमेश बिजुले पाथरी,दि 08 ःपाथरीत अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेचा प्रस्ताव मंजूर झाल्याने यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा  सत्कार पाथरी येथील वकिल संघाने करुन त्यांचे आभार मानले आहेत. तत्कालीन पालकमंत्री  नवाब मलीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी येथे वरिष्ठ स्तर न्यायालय व अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. …

Read More »

धनुष्यबाण कोणाकडे…निर्णय पुन्हा

जवळपास गेल्या अडीच-तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालय बुधवारी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल देईल, अशी चर्चा कालपासून रंगली होती. मात्र, ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भात एक महत्त्वाचे प्रकरण सुनावणीला आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या  खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली. त्यामुळे आजही सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि …

Read More »

हैदराबाद गॅझेटियर अध्यादेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई,दि 07 ः राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला होता. या निर्णयाविरुद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात बऱ्याच याचिका दाखल केल्या होत्या. याचिकांकर्त्यांनी अध्यादेशावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली असली तरी न्यायालयाने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे …

Read More »

सरकारने तिजोरी उघडली,भरीव मदतीची घोषणा…वाचा कशी असणार मदत

राज्यात आलेल्या महापुराने शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन उद्धवस्त झाले. राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत असताना दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारने आपली तिजोरी उघडली असून भरीव मदतीची घोषणा केली आहे.आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आम्ही पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. सरकारने छोटी मोठी …

Read More »