16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

विवेकानंद विद्यालयात ‘ऑपरेशन सिंदूर ‘ चा देखावा

सेलू /प्रतिनिधी येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात श्री.गणेशोत्सव निमित्त स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर यांच्या हस्ते श्री.गणेशाची स्थापना करण्यात आली.’ऑपरेशन सिंदूर’ चा देखावा सादर करण्यात आला आहे. पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ७ मे २०२५ (बुधवार )रात्रीच्या सुमारास भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’असे नाव देण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी व …

Read More »

एक मराठा लाख मराठा..रावसाहेब दानवेंना पिटाळून लावलं

जालन्यात भाजप नेते, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी जोरदार गोंधळ घातला. आपले समाज बांधव मुंबईत उपाशी मरत असताना, त्यांना पाणीही मिळत नसताना तुम्ही गावात येऊन कसली उद्घाटने करताय? अशी विचारणा करीत मराठा आंदोलकांनी दानवे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मराठा समाजाचा तीव्र रोष पाहता रावसाहेब दानवे यांना कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. इतर मागास प्रवर्गातून मराठा समाजाला …

Read More »

मराठा हे कुणबीच! – विश्वास पाटील..ब्रिटिशकालीन जनगणना नोंदी..जशीच्या तशी पोस्ट

मराठवाड्याच्या सलग चाळीस वर्षांच्या ब्रिटिशकालीन जनगणना नोंदी कशा नाकारल्या जातील, असा सवाल ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी उपस्थित केला आहे. इंडियन इव्हिडन्स ॲक्टनुसार ‘इम्पेरियल रेकॉर्ड कीपर्स’च्या नोंदींना कायदेशीर दर्जा असून, भारताच्या पहिल्या नियोजन आयोगापासून ते शेड्यूल्ड कास्ट कमिशनपर्यंत या आकडेवारीचा अधिकृत वापर झालेला आहे. अशा वेळी “मराठा कुणबी” समाजाचे स्पष्ट पुरावे समोर असूनही, त्याकडे डोळेझाक का केली जाते, असा थेट …

Read More »

एचएआरसी संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी,निराधार ताईला दिले उदरनिर्वाहाचे साधन

हिंगोली,दि 31 ः होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेतर्फे गौरी गणपती सणाच्या निमित्ताने औंढा नागनाथ येथील निराधार कांचन दिलीप राऊत यांना उदरनिर्वाहासाठी ऑल इन वन शिलाई मशीन तसेच जीवनावश्यक किराणा साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमावेळी एचएआरसी अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ राजकुमार भारूका, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशटी, समन्वयक प्रकाश डूबे, संजय लाहोटी, नीळकंठ अंभोरे, राजेंद्र खापरे आदी …

Read More »

सुप्रिया सुळेंच्या गाडीवर बाटल्या फेकल्या..प्रचंड घोषणाबाजी

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर जात भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खराब झाली असल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे यांनी गेल्या चार दिवसांपासून काही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृती खराब झाली असल्याचे सुळे यांनी सांगितले आहे. सुप्रिया सुळेंना अडवलं, पवारांविरोधात घोषणाबाजी सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची …

Read More »