17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

पान टपरी चालकांमध्ये प्रचंड घबराट,पान टपऱ्या पटापट बंद

 प्रशासकीय वर्तुळात आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कारभारासाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासन (आयुक्त तुकाराम मुंढे आज नांदेड दौऱ्यावर आल्याची एकच अफवा शहरात पसरली. या एकाच अफवेने शहरातील पान टपरी चालकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आणि कारवाईच्या भीतीपोटी दुपारनंतर शहरातील मुख्य भागातील पान टपऱ्या पटापट बंद झाल्या. अनेक टपरी चालक तर टपऱ्या कुलूपबंद करून थेट पसार झाले. तुकाराम मुंढे यांनी …

Read More »

समन्वय समितीच्या बैठकीत सिईओंकडून सर्व विभागाचा आढावा

हिंगोली, (दि. 16 ) जिल्हा परिषद हिंगोली येथील सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज समन्वय समितीची बैठक पार पडली यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सा. प्र.) समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

भारतीय संस्कृती सर्वांचा सन्मान करायला शिकविते – पद्मनाभ महाराज व्यास

सेलू( प्रतिनिधी ) सृष्टीतील सर्व जिवात्मे समान आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येकात भगवंताचे अस्तित्व आहे, त्यामुळे कुणाचाच द्वेष करू नये. भारतीय संस्कृती जिवमात्रासह वृक्षवल्ली, पशूपक्षी, पर्यावरण, सर्वांचा सन्मान करायला शिकविते, असे प्रतिपादन वे.शा.सं.ह.भ.प. पद्मनाभ व्यास महाराज यांनी केले आहे.ते शहरातील साई मंदिर, ‘भक्तितीर्थ’ परीसरात, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भागवत कथेत भाविकांना आशीर्वचनपर सोमवार (दि.१५) रोजी तीसरे पुष्प गुंफताना बोलत होते. …

Read More »

 ‘वनामकृवि’ व ‘मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र’ यांच्यात सामंजस्य करार!

हिंगोली: मराठवाडा व राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि हळद प्रक्रियेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (VNMKV) आणि मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत (जि. हिंगोली) यांच्यात आज एका महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यात आली. हरिद्रा संशोधन केंद्राचे सन्माननीय अध्यक्ष मा. ना. श्री हेमंत पाटील …

Read More »

अवैध रेती वाहतूकीचे टिप्पर जप्त, चालकासह मालकावर गुन्हा

पुर्णा, ता. १५ (प्रतिनिधी) पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपसा व वाहतुकीविरोधात परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने रविवारी धडक कारवाई करत रेतीने भरलेला टिप्पर जप्त केला. या कारवाईत चालकाला रंगेहाथ पकडण्यात आले असून चालकासह टिप्पर मालकाविरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक रविवारी अवैध धंद्यांविरोधात गस्त …

Read More »