16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी ३१ मेची मुदत

हिंगोली , दि. 25 : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत असून, सन 2019-20 ते 2025-26 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शासनाने सर्व महाविद्यालयांना 31 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. महाविद्यालय स्तरावर सन 2019-20 चे 55, सन 2020-21 चे 192, सन 2021-22 चे 152, सन 2022-23 चे 249, सन 2023-24 चे 76, …

Read More »

हिंगोलीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी 

हिंगोली,दि 25 राज्यस्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा ७ वर्षाखालील मुले व मुली30/ 31मे पुणे येथे ०९ वर्षाखालील मुले व मुली ०२/०२ जुन छत्रपती संभाजीनगर ११ वर्षाखालील मुले व मुली १३ वर्षाखालील मुले व मुली ०५ व ०७ जून सोलापूर येथे विविध गटाच्या स्पर्धा होणार आहे.  दिनांक 24 मे 2026 रविवार रोजी तालुका क्रीडा संकुल हिंगोली येथे निवड चाचणी घेण्यात आली. निवड …

Read More »

रिवा येथे घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाने काढला मोर्चा

हिंगोली,दि 25 (प्रतिनिधी) ः मध्य प्रदेशातील रीवा येथे जैन साध्वींसोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदन देण्यात आले. विहाररत जैन साधू-संतांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था लागू करावी तसेच संबंधित घटनेची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनानुसार, २० मे २०२६ रोजी रीवा जिल्हा मुख्यालयाजवळ राष्ट्रीय संत आचार्य …

Read More »

येहळेगाव सोळंके येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न

हिंगोली दि. 22 : महसूल विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर (टप्पा-1) अंतर्गत आजजिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली येहळेगाव सोळंके येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाधान शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार हरीश गाडे उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार अनिता कोलगने यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके मंडळातील नागरिकांना महसूल व इतर …

Read More »

हिंगोलीत ‘स्मार्ट मीटर’मुळे ग्राहकांच्या तक्रारींना ब्रेक

हिंगोली,दि 25 ः महावितरण कंपनीच्या वतीने जिल्हाभरात जुने वीज मीटर बदलून त्याठिकाणी अत्याधुनिक ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेनंतर आता वीज ग्राहकांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, महावितरण कार्यालयातील मीटर तपासणीची (मीटर टेस्टिंग) संख्या आता कमालीची कमी झाली असून, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत जुन्या मीटरच्या वेगाबाबत किंवा जादा वीज बिलाबाबत …

Read More »