16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

वसमत शहरात खंजर बाळगणाऱ्या दोघांना  अटक

हिंगोली,दि 15 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  वसमत शहरात खंजर शस्त्र जप्त केले आहे.याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक गस्त घालत असताना  शैलेश रोहिदास राऊत रा.कारखाना रोड वसमत,कोंडीबा बालाजी क्षीरसागर रा. कारखाना रोड वसमत यांना वसमत शहरातील हिरो शोरूम जवळ ताब्यात घेऊन अंग झडती घेतली असता त्यांचे जवळ एक धारदार घातक हत्यार …

Read More »

खेर्डा शिवारातून बैलजोडी लंपास

रमेश बिजुले पाथरी,दि 15 ः पाथरी तालुक्यातील खेर्डा शिवारात शेतातील आखाड्यावर बांधून ठेवलेली बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याची घटना गुरुवार १४ मे रोजी पहाटे घडली आहे. खेर्डा येथील शेतकरी दत्ता किशनराव मस्के यांनी पाथरी पोलीसांना दिलेल्या अर्जानुसार, त्यांच्या मालकीची सुमारे सहा वर्ष वयाची लाल व जाबळ्या रंगाची बैलजोडी शेतातील कामासाठी वापरली जात होती. सदरील शेतकरी बुधवार १३ मे रोजी …

Read More »

हुंडा पद्धतीला फाटा देत साक्षगंधांमध्येच उरकला विवाह सोहळा

हिंगोली,दि 15 ः समाजात हुंडा प्रथेसारख्या अनिष्ट रूढीला छेद देत हिंगोली येथे एका कुटुंबाने साक्षगंध समारंभातच विवाह उरकून नवा आदर्श घालून दिला आहे. राष्ट्रपती पदक विजेते सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक आनंद पुंजाराव मस्के यांचे धाकटे चिरंजीव ॲड. अक्षय आनंद मस्के व चि.सौ.का. ऋतुजा कैलासराव काईट, रा. पांढुर्णा यांचा साक्षगंध सोहळा मंगळवार दि. 12 मे 2026 रोजी नवीन पोलीस वसाहतीतील मंगल कार्यालयात …

Read More »

पूर्णेत पालिकेच्या जागेवर शाळेची‘घेराबंदी’, प्रशासनाचे मौन संशयाच्या भोवऱ्यात

पूर्णा प्रतिनिधी : पूर्णा शहरातील सार्वजनिक मालमत्तेच्या कथित बळकावणीचा मुद्दा आता चांगलाच तापू लागला असून, पालिकेच्या जागेवर सुरू असलेल्या डॉ. झाकीर हुसैन प्राथमिक उर्दू शाळेकडून कोंडवाडा आणि मुसाफिरखाना या सार्वजनिक जागांवर टप्प्याटप्प्याने कब्जा करण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराकडे नगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, “पालिका प्रशासन नेमके कुणाच्या दबावाखाली काम …

Read More »

जुने डाकघर : एक समस्या… अनेक प्रश्न!प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचा जिवंत नमुना

गंगाखेड प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा गंगाखेड शहरातील डाकघर आजही ब्रिटिशकालीन अवस्थेतच अडकून पडले आहे. पिनकोड ४३१५१४ तेव्हाच मिळाला, पण आजपर्यंत बदल झालाय तो फक्त फोन, लाईट, प्रिंटिंग आणि संगणकापुरताच! धोरणात्मक विकास? तो मात्र कागदावरच. शहर विस्तारले, लोकसंख्या वाढली, योजना वाढल्या; पण डाकघराचा विस्तार शून्य! विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक—बचत योजना, पेन्शन, पत्रव्यवहारासाठी रोजची मोठी गर्दी; तरीही बसण्याची सोय नाही, शौचालय नाही, …

Read More »